मुंबई : मी जीवावर उदार माणूस असून माझ्याकडे गमवायला काहीच नाही. सध्या घराचा हप्ता कसा भरायचा याचा फक्त ताण आहे. त्यामुळे अशा जेमतेम परिस्थितीत असलेल्या माणसाला कळलं आहे की, या देशात संविधान वाचलं तर आम्ही वाचू, अन् संविधान वाचवण्याची लढाई ही उद्धव ठाकरे वाचवू शकतात. अन् त्यांच्या पाठीमागे आम्ही लढू. अंस शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.
चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी…! आता तर राऊतांनीही केली मागणी, लढत की बिनविरोध?
भीमशक्ती आणि शिवशक्तीची ताकद आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहेत. तसेच आताच्या काळात भाजपच्या नेत्यांकडून जी काही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे एकाच वेळी सगळेच नेते या युतीबाबत वक्तव्य करीत असेल तर यामध्ये काही तरी मेख आहे. असंही त्या म्हणाल्या.
“चितरू ताई..! तुम्ही ऊर्फी विषयाची काळजी घ्या, पहिली”; रूपाली पाटलांनी चित्रा वाघ यांना डिवचलं
त्याचबरोबर शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचं महाविकास आघाडीमध्ये जमणार का ? यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, नारायण राणे यांच्या सारख्या माणसाला देवेंद्र फडणवीस पचवू शकतात. तर आमचं तर अशी काहीच भांडणं नाहीत. त्यामुळे अशा भूमिकेने नक्कीच महाविकास आघाडीमध्ये समन्वय दिसून येईल. तसेच मोदींचा मुंबई दौरा आणि देवेंद्र फडणवीस यांचं असं वक्तव्य त्यामुळे मुंबईच्या निवडणुका लवकरच लागण्याच्या तयारीत असून सरकार पडण्याच्या टप्प्यात आहे. असंही ते म्हणाल्या.
Read also
- पाच ही उमेदवारांना विजयी करा, आघाडीकडून शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीचे उमेदवार घोषीत
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ मोक्का लावून कारवाई करावी”
- भाजपचं ठरलं..! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला..?
- “राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, दावा फेटाळला, शिंदे गट तोंडावर आपटला”
- “कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी”, एकनाथ शिंदेंची मागणी