मुंबई : राज्यातील विधानसभेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. येत्या 30 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे. राज्यातील पाच मतदार संघासाठी मतदान होणार आहे. यातच आता महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून त्यांना विजयी करण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी असं म्हटलं आहे.
“चितरू ताई..! तुम्ही ऊर्फी विषयाची काळजी घ्या, पहिली”; रूपाली पाटलांनी चित्रा वाघ यांना डिवचलं
औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी काॅंग्रेसकडून धीरज रामभाऊ लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोकण शिक्षक मतदार संघात शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत उमेदवार बाळाराम दत्तात्रेय पाटील यांना महाविकास आघाडीने पाठींबा जाहीर केला आहे.
“बांगराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, बांगरावर योग्य ती कारवाई होईल”, फडणवीसांचा इशारा
तर या निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधर मतदार संघ काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांच्या बंडाळीने चर्चेत आला. या मतदार संघात शिवसेनेने शुंभागी पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर नागपूर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर गोविंदराव अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्व उमेदवारांना मदत करावी असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच, शिक्कामोर्तब, अनेक आमदार आग्रही
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक २०२३ साठी महाविकास आघाडीचे – खालीलप्रमाणे अधिकृत उमेदवार असून त्यांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाठिंबा देऊन त्यांच्या सभा / बैठकांना हजर राहणे, प्रचाराचे काम करणे व त्यांनाच जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करावयाचे आहेत. असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक – २०२३ साठी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष आ. @Jayant_R_Patil यांनी केले आहे. pic.twitter.com/Cet2tvx1Fg
— NCP (@NCPspeaks) January 25, 2023
Read also
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ मोक्का लावून कारवाई करावी”
- भाजपचं ठरलं..! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला..?
- “राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, दावा फेटाळला, शिंदे गट तोंडावर आपटला”
- “कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी”, एकनाथ शिंदेंची मागणी
- चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी…! आता तर राऊतांनीही केली मागणी, लढत की बिनविरोध?