पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगने मोठा हैदास घातला आहे. अनेक भागात रात्रीच्या वेळी कोयता गॅंग नागरिकांना धमकावून लुटत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या पुण्याकडेही लक्ष द्यावं असं म्हटलं आहे.
पाच ही उमेदवारांना विजयी करा, आघाडीकडून शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीचे उमेदवार घोषीत
सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, पुणे शहरात गेली काही दिवसांपासून गुन्हेगारांनी थैमान घातलं आहे. कोयता गॅंग आणि त्यानंतर आता राजरोसपणे गोळीबार केल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे.
“मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ मोक्का लावून कारवाई करावी”
शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कायद्याचा धाक कायम राहण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणे आवश्यक आहे. माझी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण या घटनांची गंभीर नोंद घ्यावी. शहरातील या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश द्यावेत.
पुणे शहरात गेली काही दिवसांपासून गुन्हेगारांनी थैमान घातले आहे. कोयता गॅंग आणि त्यानंतर आता राजरोसपणे गोळीबार केल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. pic.twitter.com/p9ICfrxQM5
— Supriya Sule (@supriya_sule) January 25, 2023
Read also
- “सत्यजीत तांबेचा भाजपकडून गेम होणार हे अगोदरच आम्हाला माहिती होतं”
- “शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला”; गुणरत्ने सदावर्तेंची राष्ट्रवादीवर टीका
- “देवेंद्र फडणवीसांनाच आम्ही सरप्राईज देणार”; जंयत पाटील
- “माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला त्याची पर्वा नाही”; संतोष बांगरांची त्यानंतर प्रतिक्रिया
- “मोदींचा मुंबई दौरा, फडणवीसांचं वक्तव्य, म्हणजे सरकार पडण्याच्या टप्प्यात ;” सुषमा अंधारे