मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे -फडणवीस अनेक योजनांवर काम करत आहे. त्यामुळेच येत्या 2024 मध्ये आम्ही मोठं सरप्राईज देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, दावा फेटाळला, शिंदे गट तोंडावर आपटला”
2024 साली लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणुक होईल, असे मी गृहीत धरलेले आहे. हे गृहीत धरूनच आम्ही कामाला लागलो आहोत. अलीकडे अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. त्यातून आगामी काळातील चित्र निराशाजनक नसेल. 2024 साली सकारात्मक विचार करून महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचे काम केले जाईल, लोक फार हुशार असतात.
“कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी”, एकनाथ शिंदेंची मागणी
आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षाबद्दल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे 2024 साली आमचे सरकार पुन्हा सत्तेत येईल. हेच देवेंद्र फडणवीस यांना सरप्राईज असेल. असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
- “माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला त्याची पर्वा नाही”; संतोष बांगरांची त्यानंतर प्रतिक्रिया
- “मोदींचा मुंबई दौरा, फडणवीसांचं वक्तव्य, म्हणजे सरकार पडण्याच्या टप्प्यात ;” सुषमा अंधारे
- पाच ही उमेदवारांना विजयी करा, आघाडीकडून शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीचे उमेदवार घोषीत
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ मोक्का लावून कारवाई करावी”
- भाजपचं ठरलं..! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला..?