नाशिक : राज्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता येत्या 30 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकींच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्ष तयारी करतांना दिसत आहेत. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना अद्यापही भाजपने आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यावरून शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ मोक्का लावून कारवाई करावी”
भाजपचा फसवणुकीचा कार्यक्रम फार वर्षापासून सुरू आहे. अशाच पद्धतीने भाजपने शिवसेनेला फसवण्याचे काम वारंवार केलं आहे. ही लोकं शब्दाचे पक्के नाहीत. तसेच सत्यजीत तांबेंचा भाजपकडून गेम होणार आहे, हे आम्हाला अगोदरच समजलं होतं. असं गौप्यस्फोट मनिषा कायंदे यांनी केला आहे. महाविकास आघाडीला वारंवार बदनाम करण्याचं काम सध्या भाजपचं सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या.
भाजपचं ठरलं..! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला..?
शिक्षक आणि पदवीधर विधानसभेच्या पाचही मतदार संघातील जागा महाविकास आघाडीतील उमेदवार जिंकणार आहे. असा आम्हाला विश्वास आहे. यामध्ये भाजप या निवडणुकीत एक्सपोज होणार आहे. असंही त्या म्हणाल्या. औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी काॅंग्रेसकडून धीरज रामभाऊ लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोकण शिक्षक मतदार संघात शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत उमेदवार बाळाराम दत्तात्रेय पाटील यांना महाविकास आघाडीने पाठींबा जाहीर केला आहे.
“राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, दावा फेटाळला, शिंदे गट तोंडावर आपटला”
तर या निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधर मतदार संघ काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांच्या बंडाळीने चर्चेत आला. या मतदार संघात शिवसेनेने शुंभागी पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर नागपूर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर गोविंदराव अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्व उमेदवारांना मदत करावी असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला”; गुणरत्ने सदावर्तेंची राष्ट्रवादीवर टीका
- “देवेंद्र फडणवीसांनाच आम्ही सरप्राईज देणार”; जंयत पाटील
- “माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला त्याची पर्वा नाही”; संतोष बांगरांची त्यानंतर प्रतिक्रिया
- “मोदींचा मुंबई दौरा, फडणवीसांचं वक्तव्य, म्हणजे सरकार पडण्याच्या टप्प्यात ;” सुषमा अंधारे
- पाच ही उमेदवारांना विजयी करा, आघाडीकडून शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीचे उमेदवार घोषीत