मुंबई : वेदंता प्रकरणावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. विरोधी पक्ष वारंवार शिंदे-फडणवीस सरकारवर टिका करत आहे. हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. यामुळे आता दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
“शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, जर परवानगी मिळाली नाही तर..;”गुलाबराव पाटील
मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्यामुळे माझी काही कामे झालेली नाहीत. याच कामाबाबत मुख्यमंत्र्याची मी आज भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. इतकंच नाही तर ते भेटीगाठीसाठी वेळसुद्धा देत आहेत. यामुळे प्रत्येकाचे काम हे युद्धपातळीवर सुरू आहे, असं कौतुक शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं केलं आहे.
“रशियावरून फडणवींसांचा फोन आला अन्…मला सांगितलं की..”; सांमंताचं वेदांत प्रकल्पावर मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणतंही काम घेऊन गेलो तर ते लगेचच कामे होत आहेत. मुख्यमंत्र्यांचा कामाचा लावलेला झपाटा हा कमालीचा आहे. एखादी व्यक्ती झपाटून काम करत असेल तर त्याचं कौतुक व्हायला हवं, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या. यासोबतच शिंदे गटात जाणार का असा प्रश्न विचारताच, मी एक शिवसैनिक आहे व एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत. त्यामुळे मी शिवसेनेसोबतच राहणार आहे, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
“देवाचा कौल घेऊन भाजपात प्रवेश केला”; गोव्यातील काॅंग्रेस आमदाराचं वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात मध्यस्थी करत होत्या. याबाबत मध्यस्थी झाली नाही असं म्हणता येणार नाही. चांगल्या कामाला वेळ लागत असतो. माझी इच्छा आहे की कधी ना कधी ते काम नक्की होणार, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
Read also
- “त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला
- “तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे
- “उद्योगमंत्र्यांचा तरूणांनी राजीनामा मागितला पाहिजे”; वरूण देसाई
- “पहिल्याच अधिवेशनात दिलेले वचन मुख्यमंत्री पूर्ण करत नसतील तर..;” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- “वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत”; वेदांतच्या अध्यक्षांचे स्पष्टिकरण