मुंबई : कुणालातरी माफ करणे ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी मोठं मन असावं लागतं. मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. त्यावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंंत्री अन् मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला”; रामदास कदम
नकळतपणे अजाणतेपणे चुक घडली तर निश्चितपणे अशा माणसाला क्षमा केली गेली पाहिजे. परंतु जर ठरवून कटकारस्थान रचून हेतूपुरस्परपणे कुणी गुन्हा करत असेल तर अशा लोकांना क्षमा म्हणजे पुन्हा त्याहीपेक्षा भयंकर गुन्हा करण्यासाठीचा परवाना देण्यासारखे आहे. एकनाथ शिंदे पाश्चात्य विचारवंत हॉब्स सांगतो की एक उत्कृष्ट राजकारणी आणि कुशल प्रशासक होताना चुक आणि गुन्हा यातला फरक करून कुणाला क्षमा करायची आणि कुणाला क्षमा करायचे हे कळलेच पाहिजे. असं देखील अंधारे म्हणाल्या.
सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप
त्याचबरोबर आता सुट्टी कुणालाच मिळणार नाही. माॅंसाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवण्या इतकी हिमाकत करणाऱ्य़ा रामदास कदम आणि अलीबाबा चोरांना आता सुट्टी नाही द्यायची भावांनो. असा इशारा देखील अंधारे यांनी दिला आहे. तसेच रामदास कदम यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टिका केली आहे. त्यातच एक भाग म्हणून सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांचा एक जूना व्हिडीओ ट्विट केला आहे.
सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांचा ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये रामदास कदमांना उद्धव ठाकरेंना काय काय दिलं. ते ते स्वत: च म्हणताना दिसत आहेत. त्यावरून रामदास भाई फार तोंडसुख घेतलंत आज आपण. पण हा व्हिडीओ जरा बघून घेता का तुम्हीच आहात की तुमचा जुळा भाऊ आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने आपल्यावर किती उपकार केले याचा पाढा वाचणारा या व्हिडीओतला माणूस कोण आहे ओळखा तरी जरा. असं देखील त्या म्हणाल्या.
रामदास भाई फार तोंडसुख घेतलंत आज आपण. पण हा व्हिडिओ जरा बघून घेता का तुम्हीच आहात की तुमचा जुळा भाऊ आहे. सन्माननीय उद्धव साहेब आणि शिवसेनेने आपल्यावर किती उपकार केले याचा पाढा वाचणारा या व्हिडिओतला माणूस कोण आहे ओळखा तरी जरा. @iramdaskadam , @OfficeofUT @AUThackeray @ShivSena pic.twitter.com/bupeoGrAZe
— Andhare Sushama (@andharesushama) September 18, 2022
Read also
- “मला काही समजतं नाही, राज्यात काय नेमकं काय चाललंय”; राज ठाकरेंचं भाष्य
- “शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेना असं समीकरण”; दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य
- “आपल्याला हा गड पुन्हा जिंकायचा असेल तर प्रत्येकाला पक्षात समाविष्ट करून घ्या”; जयंत पाटील
- “भास्कर जाधव यांची अवकात काय? हा नाच्या आमदार”; रामदास कदमांचा हल्लाबोल
- “सोमय्यांना तोंड लपवत फिरण्याची वेळ फडणवीसांनी त्यांच्यावर आणली”; रूपाली पाटलांचा खोचक टोला