मुंबई : दसरा मेळाव्यासाठी एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रथम अर्ज दाखल करणाऱ्या या निकषाच्या आधारे MMRD कडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला परवानगी दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावरून आता राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याच संघर्ष होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना पार्क म्हणजे शिवसेना हे असचं समीकरण राहिलं आहे. त्यामुळे त्याठिकाणी शिवसेनेलाच दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यायला हवी. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दसरा मेळावा घेण्याची परवानगी आहे. असंही शरद पवार म्हणाले. सोलापुर दौऱ्यावर आले असता शरद पवारांनी दसरा मेळाव्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजब सरकार..! “मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल तर..;”धनंजय मुडेंची टिका
शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथे परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून बीकेसीतील दुसऱ्या मैदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु संबंधित मैदान आधीच एका कंपनीकडून कार्यक्रमासाठी आरक्षित करण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
“शिंदे-फडणवीस सरकार बेशिस्तपणे वागतात, अन् ते फक्त अजित दादांना घाबरतात”; धनंजय मुंडे
दरम्यान, बीकेसीतील मैदानासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य हाच निकष जर लावण्यात आला असेल तर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्हालाच परवानगी मिळालयला हवी. कारण शिवसेनेनं पहिला अर्ज दाखल केला आहे. असा दावा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा नेमका कुणाचा होतो? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “आपल्याला हा गड पुन्हा जिंकायचा असेल तर प्रत्येकाला पक्षात समाविष्ट करून घ्या”; जयंत पाटील
- “भास्कर जाधव यांची अवकात काय? हा नाच्या आमदार”; रामदास कदमांचा हल्लाबोल
- “सोमय्यांना तोंड लपवत फिरण्याची वेळ फडणवीसांनी त्यांच्यावर आणली”; रूपाली पाटलांचा खोचक टोला
- “बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंंत्री अन् मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला”; रामदास कदम
- सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप