मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे पुतळे देखील जाळण्यात आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जबरदस्तीने माझ्या अंगावर इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा आरोप
दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल.
शरद पवारांचं स्वप्न पुर्ण.. शिवसेना संपली; मनसेचं सुचक वक्तव्य
बंडखोर आमदारांना आज सायंकाळ पर्यंत मुंबई दाखल होण्याचे आदेश सुनिल प्रभू यांनी आदेश काढले होते. मात्र त्यावर एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेत शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत. असं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ? संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर राजकीय पक्षांतील नेत्यांनी शिवसेना खासकरून संजय राऊतांवर जोरदार टिका केली आहे. भाजप आणि मनसेतील काही नेत्यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे 11 ते 12 आमदार आता शिवसेनेसोबत राहतील अशी परिस्थिती आहे. पक्ष चालवणं उद्धव ठाकरे यांचं काम नाही. त्यामुळे त्यांनी आता आयपीएल साठी तयारी करावी मातोश्री 11 बनवा असं भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
Read also:
- सेना अन् शिंदे गटात टोकाचा संघर्ष; एकनाथ शिंदेंनी विधिमंडळाचा मुख्यप्रतोद नेताच बदलला
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा अखेरचा नमस्कार ? म्हणाले.. “अशीच साथ राहु द्या”
- “ठाकरेंनी आता ‘मातोश्री 11’ नाव देऊन IPL ची तयारी करावी”; निलेश राणेंचा शाब्दिक टोला
- बंडखोर आमदारांना शिवसेनेचा शेवटचा इशारा, सायंकाळी 5 पर्यंत मुंबईत या अन्यथा..;
- उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोफ शिंदे गटात सामील; ४७ आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा