पुणे : कसब्यातील पोटनिवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्प्याच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार, उद्धव ठाकरे आणि काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. कृष्णाच्या काठावर प्रायश्चित करण्याची वेळ कुणावर आली आहे. असा सवाल करत अजित पवारांच्या टिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. सकाळी एमपीएसच्या टिकेवरून अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. त्यावर आता लाल महाल येथे झालेल्या सभेत शिंदेंनी पलटवार केला.
हेही वाचा…“पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार”, रासनेंसाठीचा मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ गेमचेंजर ठरणार का ?
भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅली काढली. या रॅलीत भाजपच्या प्रमुख नेत्यांसह शिंदे गटातील नेते, आमदार खासदारही यावेळी उपस्थित होते. एमपीएसच्या निर्णयाविरोधात स्पर्धा परिक्षा करणाऱ्या उमेदवारांनी आंदोलन केले होते. त्यात मुख्यमंत्री आपलं पत्र लोकसेवा आयोगाला पत्र न पाठवता. ते निवडणूक आयोगाला पाठवतात. असं कसं चालेल? असा सवाल अजित पवार यांनी करत शिंदेंवर नाना काटे यांच्या सभेत टिकास्त्र सोडलं होतं. त्यावर आज शिंदेंनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…राजकीय पक्षांकडून फक्त स्वार्थासाठी अल्पसंख्यांकाचा वापर, आता बदल हवा, अपक्ष उमेदवार सिद्धिक शेखांचं आवाहन
काही अनवधानाने माझ्या तोंडून काल लोकसेवा आयोगाचं निवडणून आयोग झालं. परंतु यामध्ये रिजल्डला महत्व आहे. मग ते निवडणुक आयोग असो की लोकसेवा आयोग रिझल्टला महत्व आहे. त्यामुळे रिझल्टचं काम देण्याचं काम करणारं आताचं सरकार आहे. आम्ही चुकीच्या ठिकाणी जात नाही. असं म्हणत आम्ही कृष्णाच्या काठावर प्रायश्चित करण्याची वेळ कुणावर आली आहे. हे आम्ही सांगत नाही. असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.
हेही वाचा..““निळ्या झेंड्याच्या अस्तित्वासाठी, बॅट समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा”, किशोर काशिरामांचं शेवटी मतदारांना आवाहन
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावरही टिका केली. कालपर्यंत आमचे नेते होते. त्यांनी म्हणे ऑनलाईन सभा केली, सत्ता गेली तर ते ऑनलाईन सभा घेत आहेत. असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.
Read also
- “कसब्याची जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायचीय,” चंद्रकांत पाटील
- हेही वाचा…दिल्ली, पंजाबचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटीला, मोदीविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली
- हेही वाचा..““भाजपचे आक्रस्ताळे नेते फडणवीस आणि चित्रा वाघांसारखे वाचाळ कार्यकर्ते धर्माच्या नावाने पळापळ करताय”
- हेही वाचा…राणेंना बाईनं पाडलं, अजित पवारांची टोलेबाजी, त्यात राऊतांनीही तेल ओतलं, म्हणाले, कमाल की चीज..
- हेही वाचा…“काँग्रेसने एलबीटी कर आणला, तो फडणवीसांनी बंद केला”, कसब्यात चंद्रकांत पाटलांचा घणाघात