मुंबई : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुका आता दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आल्या आहेत. येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून या निवडणुकांसाठी फक्त ४८ तास उरले आहेत. कसब्यात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १ वाजता भव्य रोड शो करणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री रासने यांच्याकडून मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा…“हेमंत रासनेंसाठी फडणवीस तर काटेंसाठी अजित पवारांची रॅली”,पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांना भाजप, शिवसेना, आर.पी.आय. रासपा, शिवसंग्राम, पतित पावन संघटना या महायुतीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी देखील आघाडीचे नेत्यांनी जोर लावला आहे. यातच हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात तळ ठोकून बसले आहेत.
हेही वाचा..“मोदीला हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा, असं म्हणणाऱ्याचा निषेध”, राष्ट्रवादीचा तो व्हिडीओ, फडणवीसांची टिका
काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी रोड शो केला. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रोड होणार आहे. या रोड शो ची सुरूवात समता भूमी सरळ रंभाजी बागवे कमान पासून होणार असून त्याचा शेवट लालमहाल येथे होणार आहे. त्यातच आज रात्री दोन्ही पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्र्यांंचं रोड शो गेमचेंजर ठरणार का ? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
Read also
- हेही वाचा…राजकीय पक्षांकडून फक्त स्वार्थासाठी अल्पसंख्यांकाचा वापर, आता बदल हवा, अपक्ष उमेदवार सिद्धिक शेखांचं आवाहन
- हेही वाचा..““निळ्या झेंड्याच्या अस्तित्वासाठी, बॅट समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा”, किशोर काशिरामांचं शेवटी मतदारांना आवाहन
- हेही वाचा…“मोदींच्या विचाराने शिंदे अन् मी चालतोय, त्याच दिशेने चिंचवडचा लोकप्रतिनिधीही चालावा”, देवेंद्र फडणवीस
- हेही वाचा…गोडसे परिवाराचा अखेर हेमंत रासने यांनाच जाहीर पाठिंबा ; अक्षय गोडसे यांचे स्पष्टीकरण
- हेही वाचा…पुण्यातल्या एमपीएसच्या आंदोलनाला यश, पण आता भाजप अन् राष्ट्रवादीत श्रेयवादीची लढाई