पुणे : मागील ७० वर्षापासून देशातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वत: च्या स्वार्थासाठी मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध या अल्पसंख्याक समाजाचा राजकीय खेळणं म्हणून वापर केला आणि आपला स्वार्थ साधल्यानंतर जाणीवपुर्वक दुलर्क्ष केले आहे. त्यामुळेच आज एवढ्या वर्षानंतरही हा अल्पसंख्याक समाजाला अनेक अडचणींशी झगडत आपले जीवन जगावे लागत आहे. असा घणाघात काल चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार सिद्धिक शेख यांनी केला आहे.
हेही वाचा..“मोदीला हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा, असं म्हणणाऱ्याचा निषेध”, राष्ट्रवादीचा तो व्हिडीओ, फडणवीसांची टिका
सिद्धिक शेख हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून लढत असून त्यांना सफरचंद हे चिन्ह मिळाले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी आपला वापर फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच केला. मात्र अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी कोणीही काम केले नाही. प्रत्येकाने आपापला राजकीय स्वार्थासाठी वापर करून नंतर आपल्याला दुर लोटले. आपल्या समाजाविषयी नेहमीच द्वेषपुर्ण वातावरण परसविण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांनी वारंवार केले आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे.! राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर पुन्हा लागले पोस्टर
कोण आहेत सिद्दिक शेख?
अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करून सिद्दिक शेख यांनी अपना वतन संघटनेच्या माध्यमातून शहरात मोठे जाळे विणले आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते काम करीत आहेत. सर्व झोपड्पट्टीधारकांसाठी त्यांनी लढा उभारला , त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले.तसेच शहरातील अनेक कामांसाठी त्यांना प्रशासकिय स्थरावर पाठपुरावा केला आहे. याच गोष्टीची धास्ती चिंचवड विधानसभेतील अनेकांनी घेतली आहे.कधीही झोपडपट्टीत न फिरकणारे नेते, आज झोपडपट्यांमध्ये फिरत आहेत. झोपडपट्टीतील एक सुशिक्षित तरुण विधानसभा लढवतोय , झोपड्पट्टीधारकांचे मतदान सिद्दिक शेख यांना होईल याची भिती प्रस्थापितांना आहे. त्यामुळे भाजपला प्रदेश स्तरावरील नेत्याला अण्णाभाऊ साठेनगरमध्ये आणावे लागत आहे. त्यामुळे सिद्दिक शेख या उमेदवारामुळे एका भाजपच्या मोठ्या नेत्याला झोपडपट्टीत यावे लागले, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
Read also
- हेही वाचा..““निळ्या झेंड्याच्या अस्तित्वासाठी, बॅट समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा”, किशोर काशिरामांचं शेवटी मतदारांना आवाहन
- हेही वाचा…“मोदींच्या विचाराने शिंदे अन् मी चालतोय, त्याच दिशेने चिंचवडचा लोकप्रतिनिधीही चालावा”, देवेंद्र फडणवीस
- हेही वाचा…गोडसे परिवाराचा अखेर हेमंत रासने यांनाच जाहीर पाठिंबा ; अक्षय गोडसे यांचे स्पष्टीकरण
- हेही वाचा…पुण्यातल्या एमपीएसच्या आंदोलनाला यश, पण आता भाजप अन् राष्ट्रवादीत श्रेयवादीची लढाई
- हेही वाचा.“हेमंत रासनेंसाठी फडणवीस तर काटेंसाठी अजित पवारांची रॅली”,पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला