पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक लागली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड या पोटनिवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या पोटनिवडणुकांसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचाराला दोन दिवस शिल्लक असल्याने राज्यातील प्रमुख नेत्यांनी यासाठी हिरीरीने यात सहभाग घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी रॅली काढत प्रचार केला आहे.
हेही वाचा..““राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा”,
कसब्यात हेमंत रासने यांच्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली सुरू झाली आहे. या रॅलीत महायुतीतील सगळेच नेते सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील सहभागी झाले आहेत. काल भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे देखील सहभागी झाल्या होत्या. तर खासदार उदयन राजे यांनी देखील हेमंत रासने यांच्यासाठी कसब्यात प्रचार केला.
हेही वाचा…” राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल”,
दुसरीकडे चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी भव्य रॅली काढत नाना काटे यांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर आज रात्री कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं चर्चेत आलं असून राज्यातील प्रमुख नेत्यांनी सध्या पुण्यातच तळ ठोकला आहे.
Read also
- हेही वाचा..“मोदीला हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा, असं म्हणणाऱ्याचा निषेध”, राष्ट्रवादीचा तो व्हिडीओ, फडणवीसांची टिका
- हेही वाचा…महाराष्ट्रची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे.! राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर पुन्हा लागले पोस्टर
- हेही वाचा…“शरद पवारांप्रमाणे नाना काटे देखील भाजपच्या पायामध्ये चांगला रूतणार”
- हेही वाचा…“मराठवाड्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार”
- हेही वाचा.““शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची गुगली,” म्हणाल्या…,