पुणे : राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाचा अभ्यासक्रम २०२३ पासून लागू न करता 2025 पासून लागू करावा. यासाठी मागील तीन दिवसापासून स्पर्धा परिक्षा करणाऱ्या उमेदवारांनी पुण्यात आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनात भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेसच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. यातच काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आज आयोगाने ही मागणी मान्य करत अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
हेही वाचा.““शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची गुगली,” म्हणाल्या…,
राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन: पुर्वक आभार. आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो की, कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार साहेबांच्या प्रयत्नमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा..““राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबई वरुन लोक आणा, सौदी वरून लोक आणा”,
सीमा प्रश्न चिघळला असताना पवार साहेबांनी मी बेळगावला येतो म्हणतात बेळगाव शांत झालं. आताही साहेबांनी एमपीएससी च्या प्रस्नी लक्ष घालताच आयोगाने नवीन परिक्षा पद्धत २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. देर आए दुरूस्त आए, पम आतापर्यंत मुलांचं झालेलं नुकसान कसं भरून काढणार? प्रश्ने कोणताहाी असो तो साहेबच सोडवू शकतात. असं लोक का म्हणतात? आज पुन्हा एकदा प्रचिती आली. या निर्णयाचं संपुर्ण श्रेय आंदोलन करणाऱ्या परिक्षार्थींचं आहे. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…” राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल”,
दरम्यान, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. असं आयोगाने ट्विट करत म्हटलं आहे.
सीमा प्रश्न चिघळला असताना आदरणीय पवार साहेबांनी मी बेळगावला येतो म्हणताच बेळगाव शांत झालं. आताही साहेबांनी #MPSC च्या प्रश्नी लक्ष घालताच आयोगाने नवीन परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला.
देर आए दुरुस्त आए, पण आतापर्यंत मुलांचं झालेलं नुकसान कसं भरून काढणार? pic.twitter.com/4GAMfyv1w9— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 23, 2023
राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो की, कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. #MPSC https://t.co/OA7Y50UfgU— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2023
Read also
- हेही वाचा.“हेमंत रासनेंसाठी फडणवीस तर काटेंसाठी अजित पवारांची रॅली”,पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला
- हेही वाचा..“मोदीला हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा, असं म्हणणाऱ्याचा निषेध”, राष्ट्रवादीचा तो व्हिडीओ, फडणवीसांची टिका
- हेही वाचा…महाराष्ट्रची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे.! राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर पुन्हा लागले पोस्टर
- हेही वाचा…“शरद पवारांप्रमाणे नाना काटे देखील भाजपच्या पायामध्ये चांगला रूतणार”
- हेही वाचा…“मराठवाड्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार”