पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस असून महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. परंतु या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीवर नाराज होऊन राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून किशोर काशिराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी देखील या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे.! राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर पुन्हा लागले पोस्टर
स्वाभिमानाला मत द्या, आंदोलकाला साथ द्या, भीमसैनिक उभा निळ्या झेंड्याच्या अस्तित्वासाठी, बॅट समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा..!असं आवाहन किशोर काशिराम यांच्याकडून मतदारांना करण्यात आला आहे. तसेच गोरगरींबाच्या विकासासाठी, आत्मसन्मानासाठी, सामाजिक अस्तित्वासाठी बॅटला मतदान करा, तसेच पॅंथर हेडकॉर्टर येथून बाबासाहेबांच्या शक्तीचा विजय करण्यासाठी निर्धार केला आणि कामाला लागतोय साथ द्या. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांप्रमाणे नाना काटे देखील भाजपच्या पायामध्ये चांगला रूतणार”
येणाऱ्या महानगरपालिकेसाठी या पोटनिवडणुकीतून आम्ही लिटमस टेस्ट घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. चिंचवडमध्ये बौद्ध समाज मोठा आहे. याठिकाणी अशा अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक दलित तरूणांना अडचणीत पकडलं आहे. त्यामुळे आता आम्हाला मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणुकीत आम्ही सगळी ताकद पणाला लावू. असंही ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मराठवाड्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार”
कर वसुली करता, घरावर प्राधिकरण अतिक्रमण शिक्का मारता, बस्स झाली गरिबांची थट्टा, प्राधिकारम घराचा सातबारा आम्हीच देऊ, सातबारा देऊ म्हणून १० वर्ष तुम्ही सगळ्यांनी सत्ता भोगली, सत्ता आली की टांगा पलटी घोडा फरार झाले. निवडणुकीत गोरगरिबांचे मते घेता, साबारा देऊ म्हणून दिशाभूल करता, कितीकाळ अल्टी पलटी आमदार होऊन हातावर तुरू देणार? गरिबाची जाण असलेला आंदोलक उमेदवार किशोर आत्मारा काशीरा यांना बॅट या निशाणी समोरील बटन दाबून विजयी करा. असंही दिपक केदार यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…“मोदींच्या विचाराने शिंदे अन् मी चालतोय, त्याच दिशेने चिंचवडचा लोकप्रतिनिधीही चालावा”, देवेंद्र फडणवीस
- हेही वाचा…गोडसे परिवाराचा अखेर हेमंत रासने यांनाच जाहीर पाठिंबा ; अक्षय गोडसे यांचे स्पष्टीकरण
- हेही वाचा…पुण्यातल्या एमपीएसच्या आंदोलनाला यश, पण आता भाजप अन् राष्ट्रवादीत श्रेयवादीची लढाई
- हेही वाचा.“हेमंत रासनेंसाठी फडणवीस तर काटेंसाठी अजित पवारांची रॅली”,पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला
- हेही वाचा..“मोदीला हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा, असं म्हणणाऱ्याचा निषेध”, राष्ट्रवादीचा तो व्हिडीओ, फडणवीसांची टिका