पुणे : पुण्यात कसबा पोटनिडणुकीच प्रचार हे शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ते भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधातील एका उमेदवाराला पाठींबा देत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता अक्षय गोडसे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा…“मराठवाड्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार”
कसब्याच्या पोटनिवडणुकीत माझा जाहीर पाठिंबा हेमंत रासने यांना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, माझे आणि हेमंत गोडसे यांचे अनेक वर्षांपासूनचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. हेमंत रासने हे गेले अनेक वर्षे दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत चांगले काम करत आहेत. आता ते या विधानसभेच्या पोटनिवडणूकीट उभे आहेत. गेली ७०-८० वर्षे गोडसे-रासने कुटुंबाचा घरोबा आहे. प्रत्येक सुखदुखात ते आमच्या सोबत असतात. नगरसेवक झाले त्यावेळीही ते आशीर्वाद घेण्यासाठी तात्यासाहेबांकडे आले होते. आता या निवडणुकीत देखील गोडसे कुटुंबाचा पाठींबा त्यांनाच असल्याचे मी जाहीर करतो असं अक्षय गोडसे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा.““शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची गुगली,” म्हणाल्या…,
विरोधी पक्षातील त्या उमेदवाराला आमच्या कुटुंबाचा जाहीर पाठिंबा असं व्हिडिओत म्हटलं नाही. ते उमेदवार मला सहज भेटायला आले होते. त्यांच्या लोकांनी मला व्हिडिओ तयार करण्याची विनंती केली. मी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. आता मी हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे अक्षय गोडसे यांनी सांगितले आहे.
Read also
- हेही वाचा…पुण्यातल्या एमपीएसच्या आंदोलनाला यश, पण आता भाजप अन् राष्ट्रवादीत श्रेयवादीची लढाई
- हेही वाचा.“हेमंत रासनेंसाठी फडणवीस तर काटेंसाठी अजित पवारांची रॅली”,पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला
- हेही वाचा..“मोदीला हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा, असं म्हणणाऱ्याचा निषेध”, राष्ट्रवादीचा तो व्हिडीओ, फडणवीसांची टिका
- हेही वाचा…महाराष्ट्रची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे.! राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर पुन्हा लागले पोस्टर
- हेही वाचा…“शरद पवारांप्रमाणे नाना काटे देखील भाजपच्या पायामध्ये चांगला रूतणार”