पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मागील पंधरा ते वीस दिवसापासून राज्यातील प्रमुख नेत्यांनी पुण्यात तळ ठोकून बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“मोदींच्या विचाराने शिंदे अन् मी चालतोय, त्याच दिशेने चिंचवडचा लोकप्रतिनिधीही चालावा”, देवेंद्र फडणवीस
हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आज कसब्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली सुरू आहे. आता थोड्या वेळाने या पोटनिवडणुकांचा प्रचार थांबणार आहे. त्यातच कित्येक दशके कसब्यात सत्ता असूनही पराभव टाळण्यासाठी आड लपणे हा भाजपचा नैतिक पराभवच आहे. धंगेकरांच्या विजयाची आता केवळ औपचारिकता बाकी आहे. असं प्रशांत जगताप यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा…गोडसे परिवाराचा अखेर हेमंत रासने यांनाच जाहीर पाठिंबा ; अक्षय गोडसे यांचे स्पष्टीकरण
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचं काल एक व्हिडीओ व्हायरल झालं होतं. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर जहरी टिका केली होती. त्यावर बोलतांना जगताप म्हणाले की, डोळ्यासमोर पराभव स्पष्ट दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाजपचे आक्रस्ताळे नेते फडणवीस आणि चित्रा वाघांसारखे वाचाळ कार्यकर्ते धर्माच्या नावाने पळापळ करताय. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे जाती धर्माच्या पलीकडे माणूसकी जपणारे माणूस म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भाजपने सुरू केलेला धार्मिक प्रचार हा त्यांच्याच अंगलट येणार आहे. उलट यामुळे रवीभाऊंचं मताधिक्य वाढण्यास मदत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
डोळ्यासमोर पराभव स्पष्ट दिसू लागल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाजपचे आक्रस्ताळे नेते फडणवीस आणि चित्रा वाघांसारखे वाचाळ कार्यकर्ते धर्माच्या नावाने पळापळ करताय. मविआ चे उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर हे जाती धर्माच्या पलीकडे माणूसकी जपणारे माणूस म्हणून ओळखले
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 24, 2023
Read also
- हेही वाचा…राणेंना बाईनं पाडलं, अजित पवारांची टोलेबाजी, त्यात राऊतांनीही तेल ओतलं, म्हणाले, कमाल की चीज..
- हेही वाचा…“काँग्रेसने एलबीटी कर आणला, तो फडणवीसांनी बंद केला”, कसब्यात चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- हेही वाचा…“पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार”, रासनेंसाठीचा मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ गेमचेंजर ठरणार का ?
- हेही वाचा…राजकीय पक्षांकडून फक्त स्वार्थासाठी अल्पसंख्यांकाचा वापर, आता बदल हवा, अपक्ष उमेदवार सिद्धिक शेखांचं आवाहन
- हेही वाचा..““निळ्या झेंड्याच्या अस्तित्वासाठी, बॅट समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा”, किशोर काशिरामांचं शेवटी मतदारांना आवाहन