पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात आला आहे. उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी काही शिल्लक तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे कसबा आणि चिंचवडमध्ये राजकीय नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यातच काल चिंचवडमध्ये अजित पवारांनी नाना काटे यांच्या सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली. तोच व्हिडीओ खासदार संजय राऊतांनी ट्विट करत जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…गोडसे परिवाराचा अखेर हेमंत रासने यांनाच जाहीर पाठिंबा ; अक्षय गोडसे यांचे स्पष्टीकरण
अजित पवारांची काल चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांची प्रचार सभा पार पडली. त्या सभेत अजित पवार यांनी शिवसेनेच्या बंडाळीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निशाण्यावर धरलं. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. सर्व पडले की नाही? राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात पडले. दुसऱ्यांदा वांद्रे की कुठे तरी पाडले. हा. तिथे पडले. तिथे तर महिलेने पाडलं. बाईनं पाडलं. बाईंन. ही त्यांची प्रत्येकाच काय परिस्थिती आहे. असा टोला अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर लगावला.
हेही वाचा…पुण्यातल्या एमपीएसच्या आंदोलनाला यश, पण आता भाजप अन् राष्ट्रवादीत श्रेयवादीची लढाई
अजित पवारांचा हाच व्हिडीओ ट्विट करत राऊतांनी नारायण राणेंना डिवचलं. दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज..! असाच असतो एकदम मोकळा ढाकळा..! सहज सोप्या भाषेत थेट संदेश..! असं ट्विट करत संजय राऊतांनी राणेंना डिवचलं आहे. त्यामुळे त्यावर आता राणेंकडून काय निर्णय देणार ते पाहणं महत्ताचं ठरणार आहे.
दादा म्हणजे कमाल आहे.
कमाल की चीज!
नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा!
सहज सोप्या भाषेत थेट संदेश!
जय महाराष्ट्र! https://t.co/DnjCD4lCZl— Sanjay Raut (@rautsanjay61) February 24, 2023
Read also
- “काँग्रेसने एलबीटी कर आणला, तो फडणवीसांनी बंद केला”, कसब्यात चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- “पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार”, रासनेंसाठीचा मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ गेमचेंजर ठरणार का ?
- हेही वाचा…राजकीय पक्षांकडून फक्त स्वार्थासाठी अल्पसंख्यांकाचा वापर, आता बदल हवा, अपक्ष उमेदवार सिद्धिक शेखांचं आवाहन
- हेही वाचा..““निळ्या झेंड्याच्या अस्तित्वासाठी, बॅट समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा”, किशोर काशिरामांचं शेवटी मतदारांना आवाहन
- हेही वाचा…“मोदींच्या विचाराने शिंदे अन् मी चालतोय, त्याच दिशेने चिंचवडचा लोकप्रतिनिधीही चालावा”, देवेंद्र फडणवीस