सातारा – सातारा जिल्हा बँकेची निवडणूक रणधुमाळी नुतीच संपली आहे आणि धक्कादायक निकाल या निमित्ताने समोर आले आहेत. संपूर्ण सातारा जिल्हयाचे लक्ष लागलेल्या पाटण सोसायटी मतदार संघातील गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या सहकारातील निवडणुकीकडे सर्वच राजकारण्यांच्या नजरा आता लागल्या होत्या.
यामध्ये सत्यजितसिंह पाटणकर यांनी राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा पराभव केला आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या सातारा जिल्हा बँकेत दस्तुरखुद्द महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याचा पराभव झाल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
रत्नागिरीत राणेंच्या पॅनलचा सुपडा साफ; जिल्हा बँकेवर शिवसेनेच्या सामंतांचा वरचष्मा
सातारा जिल्ह्यातील आपला राजकीय दबदबा, प्रतिष्ठा व आगामी काळातील राजकारणावर आता देसाईंच्या पराभवाचे परिणाम दिसून येतील. ना. देसाई यांनी अतिशय आत्मविश्वासाने उमेदवारी केली होती. त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हावेच लागेल, असे मत देखील अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडले होते.
दुसऱ्या बाजूला जावळी सोसायटी मतदारसंघाकडे देखिल सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध त्यांच्याच पक्षातील नेते ज्ञानदेव रांजणे यांच्यात लढत होती. ही लढत देखील अत्यंत हायहोल्टेज लढत मानली जात होती. मतदानाच्या दिवशी शिंदे आणि रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी झाल्याचा प्रकार देखील समोर आला होता.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’; सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे महापौर
या लढतीच्या पार्श्वभूमीवर जावळी भागात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. आता लागलेल्या निकालानुसार जावळी सोसायटी मतदारसंघातून
आमदार शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला आहे. ज्ञानदेव रांजणे हे अवघ्या एका मताने विजयी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या सांगण्यावरून आपण उमेदवारी ठेवली आहे असं देखील रांजणे यांनी यापूर्वी म्हटलं होतं.
शशिकांत शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे यांना २५ मते मिळाली आहेत. जिल्हा बँकेची जावळी सोसायटीची निवडणूक ही राजा विरुद्ध प्रजा अशी झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.
Read Also :
- आमदार महेश लांडगेंची मानवता : संपकरी एसटी कामगारांच्या घरचे भरले ‘राशन’
- परमबीर सिंग भारतातच, ४८ तासांत हजर होतील; कोर्टात वकिलाचा दावा
- एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील; खासदार नवनीत राणांचा विश्वास
- शरद पवारांसोबत चार तास चर्चा केल्यानंतर एसटी संपावर अनिल परब यांचं मोठं विधान
- विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने विदर्भात मोठ्या नेत्याचा भाजपला रामराम..!