मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि फरार घोषित केलेले माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग भारतातच असल्याचे समोर आले आहे. याबाबत सिंग यांच्या वकिलांनी कोर्टाला माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने परमबीर सिंग समोर येत नाहीत. पुढील ४८ तासांमध्ये कोणतेही सीबीआय अधिकारी अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची त्यांची तयारी आहे, असा दावा त्यांच्या वकिलाने दिली.
फडणवीसांचा ‘तो’ गुण चांगला; नवाब मलिक यांनी कौतुक करत मारला टोला
दरम्यान, परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग न्यायालयासमोर हजर झाले नाहीत, तर राज्य सरकारला त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार असणार आहे.
आम्ही गरजणारे नाही तर बरसणारे; विधान परिषदेत अमल महाडिकच विजयी होणार – चंद्रकांत पाटील
बांधकाम व्यावसायिक विमल अगरवाल याने निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे व परमबीरसिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने परमबीरसिंह, विनयसिंह व रियाझ भाटी यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. आरोपींवर एकापेक्षा अधिक अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही ते न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. या आधारावर या तिघांनाही ‘फरार’ घोषित करण्याची विनंती मुंबई पोलिसांनी किल्ला कोर्टाला केली होती.
Read Also :
- एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील; खासदार नवनीत राणांचा विश्वास
- शरद पवारांसोबत चार तास चर्चा केल्यानंतर एसटी संपावर अनिल परब यांचं मोठं विधान
- विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने विदर्भात मोठ्या नेत्याचा भाजपला रामराम..!
- कोनशिलावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याच नावं चुकलं; अजित पवारांनी चक्क डोक्यालाच हात लावला
- प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड आता निश्चित; भाजपचा उमेदवारी अर्ज मागे