अहमदनगर : पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे निलेश लंके यांनी त्यांच्या कोविड पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात शरद पवार यांच्या हातून करून घेतले. यावेळी निलेश लंके यांच्यात हातात शरद पवार यांची तुतारी घेतल्याचे काही फोटो व्हायरल झालेत. यातून लंके शरद पवार गटातच असल्याचे दिसून आले. निलेश लंके दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकी लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे निलेश लंके शरद पवार गटात गेल्यास त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे सध्या पारनेर तालुक्यामध्ये आणि दक्षिण नगर भागात निलेश लंके यांची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की..,
निलेश लंके यांनी पुण्यातल्या राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांची भेट घेतली. तसेच लंके लवकरच शरद पवार गटात दाखल होतील. अशा चर्चा सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निलेश लंके यांना चांगलेच खडसावले. तसेच निलेश लंके जर खासदारकीसाठी त्याबाजूला जात असतील तर त्यांना अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. तसेच लंके यांच्या डोक्यात काहींनी खासदारीकीचा विचार भरला असल्याची टिकाही अजित पवारांनी केली.
यातच आता निलेश लंके यांना दक्षिण नगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याने विरोधकांनीही मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. निलेश लंके यांचे पुर्वीचे खंदे समर्थक विजुभाऊ सदाशिव औटी हे सध्या पारनेर तालुक्यातील विविध भागात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन युवा संवाद साधत आहेत. यातच पारनेचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी देखील काही दिवसापुर्वी अजित पवार यांची भेट घेतल्याचे दिसून आले.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर
जर पारनेरचे आमदार निलेश लंके हे खासदार पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर त्यांना निश्चितच आमदाराकीचा सुरूवातीला राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे त्यांच्या जागी आता अजित पवारांनी पर्याय निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. यातच विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांसमोर लंके यांनी कडवं आव्हान उभे केले आहे. अशातच लंके लोकसभेला निवडून आले तरच खासदार होऊ शकतात. अन्यथा न घर का न घाट का अशी अवस्था लंके यांची होऊ शकते. अशी चर्चा सध्या सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंच्या विरोधात भाजप बंडाच्या पावित्र्यात..”, मावळात महायुतीत मिठाचा खडा ?
हेही वाचा…“आजोबाला अर्धांगवायू, वय वर्षे ६२, पेशाने रिक्षाचालक, येणार तर मोदीच “, भाजप नेत्याचा अनुभव
“तिकीट कापलं, तरीही पक्षावर निष्ठा कायम, मुळीकांची मोहोळांनी घेतली गळाभेट”
हेही वाचा…“मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा..संपुर्ण देशात आचारसंहिता लागू ; निवडणुकीच्या काळात काय करावे , काय करू नये ? वाचा