मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यातच पक्ष फुट, अपात्र आमदार प्रकरण यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी शनिवारी रात्री एक महत्वाची बैठक पार पडली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता, भाजपचा डीएनए ओबीसी”, फडणवीसांचा शरद पवारांना टोला
शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीचं पक्षनाव आणि चिन्हांबाबत निवडणुक आयोगात सुनावणी होत आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत लवकरच विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. तर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह मिळणार की नाही, याबाब धास्ती भरली आहे. यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर शनिवारी उशिरापर्यंत बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंच्या रूपात मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर पडली”, भाजपनं ठाकरेंना डिवचलं
या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास झालेल्या या बैठकीत आमदार अपात्र प्रकरणात उद्धवणाऱ्या कायदेशीर पेचप्रसंगातून कसा मार्ग काढायचा ? लॉ फर्मची कशाप्रकारे मदत घ्यायची यावर चर्चा झाल्याचे समजत आहे. याशिवाय राज्यातील मराठा तसेच ओबीसी आरक्षणाबाबतही चर्चा झाल्याचे कळते आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रातील नेतृत्वाकडे शब्द टाकण्यातबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंना ‘ती’वाघनखे स्वत; ची वाटत असावीत”, शिंदे गटाचा ठाकरेंना टोला
हेही वाचा…ठाकरे गटाचा दक्षिण मुंबई लोकसभेचा उमेदवार ठरला, शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देणार
हेही वाचा…“गौतमी पाटीलचा डान्स शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल”, शिक्षणमंत्र्यांनी दिला कारवाईचा आदेश
हेही वाचा…पाच राज्यांत भाजपला पराभवाचा धोका, निवडणुकांच्या आधीच मोदींच्या सभांचा जंगी कार्यक्रम जाहिर
हेही वाचा…आरोप केले तर सिद्ध करून दाखवा, दानवेंनी वडेट्टीवारांना दिले थेट आव्हान