मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. यातच आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. यातच दक्षिण मुंबई लोकसभेची जागा अरविंद सावंत यांना देण्यात आली असून सावंत यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावा, असं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
हेही वाचा…“नको असलेले नेते दिल्लीला पाठवण्याची भाजपची प्रथा”, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जंयत पाटलांचा टोला
लोकसभा मतदारसंघाचा आढावा मागील काही दिवसापासून ठाकरे गटाकडून घेण्यात आला आहे. यातच आता मुंबईतील एक एक मतदारसंघासाठी उमेदवार निवडीचा पर्याय शोधला जात आहे. यातच आता दक्षिण मुंबईतून खासदार असलेल्या अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तर उत्तर पश्चिम लोकसभेचा मोठा तिढा निर्माण झाला आहे.
हेही वाचा…“राज्याच्या पैशावर सहली करण्याचा भाजप सरकारचा डाव आदित्य ठाकरेंमुळे रद्द झाला”
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून सध्या गजानन किर्तीकर खासदार असून ते शिंदे गटात आहे. तर गजानन किर्तीकर यांचे सुपूत्र अमोल किर्तीकर ठाकरे गटात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात पिता विरूद्ध पुत्र असा राजकीय सामना बघायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गौतमी पाटीलचा डान्स शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल”, शिक्षणमंत्र्यांनी दिला कारवाईचा आदेश
हेही वाचा…पाच राज्यांत भाजपला पराभवाचा धोका, निवडणुकांच्या आधीच मोदींच्या सभांचा जंगी कार्यक्रम जाहिर
हेही वाचा…आरोप केले तर सिद्ध करून दाखवा, दानवेंनी वडेट्टीवारांना दिले थेट आव्हान
हेही वाचा…“राष्ट्रवादीला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता, भाजपचा डीएनए ओबीसी”, फडणवीसांचा शरद पवारांना टोला
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंच्या रूपात मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर पडली”, भाजपनं ठाकरेंना डिवचलं