नाशिक : नृत्यांगना गौतमी पाटीलची चर्चा अलिकडेच सातत्याने सुरू आहे. यातच गौतमी पाटीलने दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर डान्स केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून आता उलटसुलट चर्चा रंगू लागल्या असतांना काॅंग्रेसने यावरून शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना कारवाई करणार का ? असा सवाल केला आहे. त्यावर आता संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.
हेही वाचा…“राज्याच्या पैशावर सहली करण्याचा भाजप सरकारचा डाव आदित्य ठाकरेंमुळे रद्द झाला”
गौतमी पाटीलचा डान्स शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल. असं शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील जिल्हा परिषद शाळेत गौतमी पाटील हिचा डान्सचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
हेही वाचा…अजित पवारांचं ‘ते’ व्यक्तव्य अन् शरद पवार गट निवडणूक आयोगात बाजी मारणार, राजकीय वर्तुळात चर्चा
नृत्यांगना गौतमी पाटील मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेेत आली आहे. वलखेड प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठिकाणी ही तयारी करण्यात आली होती. त्यावरून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना हेच शिक्षण देणार का ? असा सवाल करीत काॅंग्रेसने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…राज ठाकरेंचे ‘२०’ शिलेदार लोकसभेचा सादर करणार अहवाल, 2 ऑक्टोंबरला बोलवली महत्वाची बैठक
नृत्यंगना गौतमी पाटीलने दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत डान्स केला. दारू बनवणाऱ्या सीग्राम कंपनीचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र शिक्षण विभागाला याचा थांगपत्ता नाही. या प्रकरणी शिक्षणमंत्री दिपक केसरकर कारवाई करणार का ? असा सवाल करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पाच राज्यांत भाजपला पराभवाचा धोका, निवडणुकांच्या आधीच मोदींच्या सभांचा जंगी कार्यक्रम जाहिर
हेही वाचा…आरोप केले तर सिद्ध करून दाखवा, दानवेंनी वडेट्टीवारांना दिले थेट आव्हान
हेही वाचा…“राष्ट्रवादीला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता, भाजपचा डीएनए ओबीसी”, फडणवीसांचा शरद पवारांना टोला
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंच्या रूपात मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर पडली”, भाजपनं ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“नको असलेले नेते दिल्लीला पाठवण्याची भाजपची प्रथा”, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जंयत पाटलांचा टोला