मुंबई : इंग्लडमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं आता भारतात आणली जात आहेत. मात्र यावरून आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी यावरून भाजपला काही प्रश्न केले आहेत. महाराष्ट्रात येत असलेली वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यावरून आता भाजपने ठाकरेंना जोरादार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंच्या रूपात मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर पडली”, भाजपनं ठाकरेंना डिवचलं
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच ब्रिटनहून मायदेशी परत आणणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. ही वाघनखे परत आणण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत लंडन येथे जाणार आहेत. तेथील विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये हा सामंजस्य करार केला जाणार आहे. ती महाराजांची वाघनखं आहेत असा दावा केला आहे. हा आमच्या भावनांचा प्रश्न आहे त्यामुळे नक्की ती वाघनख छत्रपती शिवाजी माहाराजांनी वापरलेलीच आहेत का की शिवकालीन आहेत? असा सवाल ठाकरेंनी केली आहे.
हेही वाचा…“नको असलेले नेते दिल्लीला पाठवण्याची भाजपची प्रथा”, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जंयत पाटलांचा टोला
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मृतीचिन्ह कोणतेही असेल त्याचे शिवप्रेमी निश्चितच स्वागत करतील. राज्य सरकार तलवार आणि वाघनखे दोन्ही महाराष्ट्रात आणणार आहे. त्याचे स्वागत महाराष्ट्र करेल. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जी वाघ नखे आणतील ती खरी असतील आदित्य ठाकरे यांना वाघ नखांबद्दल काय माहिती आहे? हे मला माहित नाही, त्यांना स्वत:ची नखे वाघनखे वाटत असावीत. असा टोला शिंदे गटातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी लगावला आहे.
हेही वाचा…“राज्याच्या पैशावर सहली करण्याचा भाजप सरकारचा डाव आदित्य ठाकरेंमुळे रद्द झाला”
दरम्यान, विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनघं जेम्स ग्रँड डफ या इतिहासतज्ज्ञांच्या संग्रहातील असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यावर सरकारने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जर ती महाराजांचीच असतील तर ती परत आणायलाच हवीत आणि महाराजांचं मंदिर बांधून त्यात ती वाघनखं ठेवली गेली पाहिजेत, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाचा दक्षिण मुंबई लोकसभेचा उमेदवार ठरला, शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देणार
हेही वाचा…“गौतमी पाटीलचा डान्स शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल”, शिक्षणमंत्र्यांनी दिला कारवाईचा आदेश
हेही वाचा…पाच राज्यांत भाजपला पराभवाचा धोका, निवडणुकांच्या आधीच मोदींच्या सभांचा जंगी कार्यक्रम जाहिर
हेही वाचा…आरोप केले तर सिद्ध करून दाखवा, दानवेंनी वडेट्टीवारांना दिले थेट आव्हान
हेही वाचा…“राष्ट्रवादीला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता, भाजपचा डीएनए ओबीसी”, फडणवीसांचा शरद पवारांना टोला