अकोला : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठिवला आहे. हा प्रस्ताव पाठविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी दबाव आणल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावरून आता नितीन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फडतूस म्हणून उल्लेख केला.
हेही वाचा…“चुकीची प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची काही घटकांकडून भूमिका”,शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
एका जिल्हा परिषद सदस्याला अपात्र करण्यासाठई अधिकाऱ्यांवर दबाव टाकणारे उपमुख्यमंत्री व अकोला जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे फडतूस असून त्यांच्याकडे कोणतीही विचारणा करणार नाही. असं नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. यावरून आता भाजपकडून नितीन देशमुख यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“पालिकेकडून कोटींचा निधी लाटला, पण अद्यापही कामांना सुरूवात नाही”, शिंदे सरकारमधील ‘या’ आमदारांचा अजब कारभार
दरम्यान, ७ ऑक्टोबरला येणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत विचारणा करणार का ? असा सवाल पत्रकारांनी उपस्थितीत केला होता. त्यावर त्यांनी फडणवीसांचा फडतूस असा उल्लेख केला. यापूर्वीही भाजपच्या नेत्यांवर टिका करताना आमदार नितीन देशमुख यांची जीभ घसरली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर टिका केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले, तेव्हाच राऊतांसारखी त्यांची वक्तव्ये”, शिंदे गटाने डिवचलं
हेही वाचा…काॅंग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता भाजपही जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
हेही वाचा…“संजय राऊत लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात”, कुणी केली टिका ?
हेही वाचा…“बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी”, वडेट्टीवारांची राज्य सरकारकडे मागणी