मुंबई : गेल्यावर्षाप्रमाणे याही वर्षी दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी एक महिन्याच्या आधीच दोन्ही गटाने महापालिकाकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र, मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा निर्धार आता ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यावर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी,” मंत्री दिपक केसरकर म्हणाले की..,”
जिथे हा शिवसेनेचे दसरा मेळावा होतो तिथे इतिहास होतो. मागील ५० ते ५५ वर्षापासून आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहोत. आता हे बेईमान लोक त्यावर दावा सांगत आहेत. शिवसेनेची मराठी माणसाची ताकद कमी करणं हेच आहे. हे षडयंत्र आहे. शिवसेनेच्या समोर शिवसेनेच्या लोकांचं आव्हान उभं केलं जात आहे. तुम्ही कितीही आव्हानं द्या, रॅली होणारच आणि ही रॅली शिवतीर्थावरच होणार आहे. तुमच्या सत्तेने आम्हाला चिरडण्याचं काम केलं, दिल्लीतून आर्मी बोलवा तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. रॅली होणारच आणि तीही शिवतीर्थावरच असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदाराला प्रचार करण्याची लगीनघाई, पाहा नेमकं काय घडलं ?
दरम्यान, संजय राऊत हे लिहितांना चिलीम आणि बोलतांना गांजा घेऊन बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलवण्यावर आणि लिहिण्यावर प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही. शिवाजी पार्कच्या संदर्भात मुंबई महानगरपालिका जो निर्णय घेईल, तो जनतेला मान्य असेल. असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
“संजय राऊत हे लिहिताना चिलीम आणि बोलताना गांजा घेऊन बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आणि लिहिण्यावर प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही. शिवाजी पार्कच्या संदर्भात मुंबई महानगरपालिका जो निर्णय घेईल, तो जनतेला मान्य असेल.” @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/QanCTBgXms
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी”, वडेट्टीवारांची राज्य सरकारकडे मागणी
हेही वाचा…“चुकीची प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची काही घटकांकडून भूमिका”,शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“पालिकेकडून कोटींचा निधी लाटला, पण अद्यापही कामांना सुरूवात नाही”, शिंदे सरकारमधील ‘या’ आमदारांचा अजब कारभार
हेही वाचा…आमदार बेनकेंची डबल ढोलकी सुरूच, काल साहेबांच्या मंचावर, तर ७ ला दादांचा जंगी कार्यक्रम
बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, जु्न्नरचं राजकारण तापणार