जुन्नर : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीत अत्यंत जवळच्या माणसांनी शरद पवारांची साथ सोडली असली तरी पवारांनी पुन्हा पक्ष बांधणीसाठी सुरू केले आहे. यात आंबेगावचे अत्यंत कट्टर समर्थक असलेले दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली. यातच आता यांच्या जागेवर शरद पवार नव्या शिलेदारांची शोध मोहिम सुरू केली आहे.
हेही वाचा…ठाकरे अन् काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांवर आयकर विभागाची धाड, अडचणी वाढल्या
जुन्नर येथे १ ऑक्टोबर रोजी आदिवासी चौथरा अभिवादनानिमित्त जुन्नर तालुक्यात मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके उपस्थित होते. अतुल बनके यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु ते अजित पवार गटात असल्याचं म्हटलं जातं. अतुल बेनके यांनाच पर्याय शरद पवार शोधत असल्याचं सांगितलं जातं.
हेही वाचा…कोविड घोटाळा..! राऊतांचं नाव वापरून सुजित पाटकरने कंत्राट मिळवलं, इडीचा मोठा दावा
यातच शरद पवारांना अतुल बेनके यांनी विघ्नहर सहकारी कारखान्याचे संचालक आणि काॅंग्रेस नेते सत्यशील शेरकर यांची भेट घालून दिली. सत्यशील शेरकर यांच्या घरी शरद पवार अतुल बेनके यांनी जेवणही केलं. त्यानंतर शरद पवारांनी बेनकेंच्या घरी भेट देऊन त्यांचे वडील वल्लभशेठ बेनके यांच्या तब्येतीची विचारपुस केली.
हेही वाचा…“ओबीसींना गाजर देणाऱ्या भाजपची बेगडी जागर यात्रा,” वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, आगामी काळात अतुल बेनके अजित पवार गटात गेले तर जुन्नर विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण असावा ? याची चाचपणी शरद पवार करीत असल्याचं बोललं जात आहे. यातच काॅंग्रेसचे दिवंगत नेते सोपानशेठ शेरकर यांचे सुपूत्र असलेले सत्यशील शेरकर यांच्याशी शरद पवारांनी काल चर्चा केली. सध्या सत्यशील शेरकर यांच्याभोवती जुन्नर तालुक्यातील राजकारण फिरत असल्याने युवक काॅंग्रेसच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि युवकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.त्यांची युवा वर्गात चांगली क्रेझ असून आगामी विधानसभा निवडणुकीत शेरकर उभे राहिले तर याठिकाणी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी,” मंत्री दिपक केसरकर म्हणाले की..,”
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदाराला प्रचार करण्याची लगीनघाई, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…“दिल्लीतून आर्मी बोलवा, ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार”
हेही वाचा…“वाघनखं खरंच महाराजांची असतील तर मग ती भाड्याने का आणताय?” ठाकरे गटाचा भाजपला सवाल
हेही वाचा…धनंजय मुंडे निवडणुक आयोगाचे अध्यक्ष झालेत का ? सुप्रिया सुळेंचा मुंडेंना खोचक सवाल