मुंबई : मुंबईतील कथित कोवीड घोटाळ्यामध्ये आता ईडीने नवी माहिती सादर केली आहे. सुजित पाटकर यांनं टेंडरसाठी पालिका अधिकाऱ्यांकडे खासदार संजय राऊत यांच्या नावाच संदर्भ दिला आहे. संजीव जयस्वाल यांच्या भेटीसाठी सुजित पाटकरकडून राऊतांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचं इडीने दोषारोप पत्रात म्हटलं आहे. यावरून आता संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“गौतमी पाटीलचा डान्स शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल”, शिक्षणमंत्र्यांनी दिला कारवाईचा आदेश
कोविड काळात सुजित पाटकर यांनी संजय राऊतांचं नाव वापरून टेंडर मिळवलं असल्याचं इडीने म्हटलं आहे. यातच राजकीय संबंधामुळे पाटकरला टेंडरची माहिती मिळत होती. राऊतांना न विचारताच सुजित पाटकरकडून त्यांच्या नावाचा वापर केला जात होता. लाईपलाईन कंपनी स्थापन करण्याआधीच टेंडर मिळवण्यासाठी पाटकरचे प्रयत्न होते. कागदपत्रे कमी असतानाही पाटकरच्या लाईफलाईन कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे. संजीव जयस्वाल यांच्याकडून लाईफलाईन कंपनीला कंत्राट देण्यात आलं असल्याचं इडीने म्हटलं आहे.
हेही वाचा…पाच राज्यांत भाजपला पराभवाचा धोका, निवडणुकांच्या आधीच मोदींच्या सभांचा जंगी कार्यक्रम जाहिर
दरम्यान, पालिका अधिकारी केशव उबाळे यांनी इडीला दिलेल्या जबाबात याचा उल्लेख करण्यात आला आहे. यातच सुजित पाटकर याने संजय राऊतांच्या नावाचा वापर करून कंत्राट मिळवलं असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ओबीसींना गाजर देणाऱ्या भाजपची बेगडी जागर यात्रा,” वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…बारामती अॅग्रो कारवाईबाबत रोहित पवारांचं ‘त्या’ दोन नेत्यांवर आरोप, अजित पवार म्हणाले…,
हेही वाचा…फडणवीसांनी अजित पवार अन् शिंदेंना दिला कानमंत्र, वर्षावर रात्री उशिरापर्यंत बैठक
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंना ‘ती’वाघनखे स्वत; ची वाटत असावीत”, शिंदे गटाचा ठाकरेंना टोला
हेही वाचा…ठाकरे गटाचा दक्षिण मुंबई लोकसभेचा उमेदवार ठरला, शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देणार