मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून इतर आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही जोरदार तापू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आजपासून ओबीसी जागर यात्रा सुरू करीत आहे. २ ते १२ ऑक्टोबर या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ जिल्हे यात्रा असणार असून या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला यावरून काही प्रश्न विचारले आहेत.
हेही वाचा…पाच राज्यांत भाजपला पराभवाचा धोका, निवडणुकांच्या आधीच मोदींच्या सभांचा जंगी कार्यक्रम जाहिर
ओबीसींना गाजर देणाऱ्या भाजपची बेगडी जागर यात्रा असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ओबीसींचे आरक्षण घालविणाऱ्या कंत्राटी नोकरभरती चे आदेश रद्द करणार का? २७% आरक्षण असताना सरकारी नोकरीत ओबीसी कर्मचाऱ्यांची संख्या फक्त १२% का? १५% टक्के जागा रिक्त का ठेवण्यात आल्या आहे? परदेशी शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती संख्या १०० विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार का? सत्तेत आल्यावर एक महिन्यात ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे वचन भाजपचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. सत्तेत येऊन दीड वर्ष होत आले ओबीसीचे कमी झालेले राजकीय आरक्षण परत कधी देणार? असे सवाल वडेट्टीवारांनी भाजपला केले आहे.
हेही वाचा…आरोप केले तर सिद्ध करून दाखवा, दानवेंनी वडेट्टीवारांना दिले थेट आव्हान
दरम्यान, ओबीसी समाजाकरीता काँग्रेसने स्व.विलासराव देशमुख यांच्या काळात ५०% शिष्यवृत्ती योजना आणली होती, ती १०० टक्के करणार का? गुपचूप सरसकट ओबीसी (कुणबी) प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी बावनकुळे करणार का ? बोगस प्रमाणपत्रावर ओबीसींच्या हक्काच्या नोकऱ्या लाटणाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी ते गृहमंत्र्यांकडे करणार का? खोट्या प्रमाणपत्राद्वारे नोकऱ्या मिळवून मंत्रालयात बसलेल्यांचा शोध बावनकुळे घेणार काय? केंद्र सरकारच्या 90 अधिकाऱ्यांपैकी फक्त 3 #OBC का? पंतप्रधानांकडे ओबीसींची जनगणना करण्याची मागणी करणार का ? असा सवालही केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी समाजाला त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती द्या. प्रामाणिकपणे जागर करा. मतांचं राजकारण करण्यासाठी ओबीसी समाजाला तुमच्या पक्षाचं इव्हेंट बनवू नका. समाजाची प्रगती व उन्नती तेव्हाच होईल. असाही टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.
ओबीसींना गाजर देणाऱ्या भाजपची
बेगडी जागर यात्रा…भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामाणिकपणे आज ओबीसी जागर यात्रेत खालील गोष्टींवर जागर करावा.
१) ओबीसींचे आरक्षण घालविणाऱ्या कंत्राटी नोकरभरती चे आदेश रद्द करणार का?
२)ओबीसी समाजाला २७% आरक्षण असताना सरकारी…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…बारामती अॅग्रो कारवाईबाबत रोहित पवारांचं ‘त्या’ दोन नेत्यांवर आरोप, अजित पवार म्हणाले…,
हेही वाचा…फडणवीसांनी अजित पवार अन् शिंदेंना दिला कानमंत्र, वर्षावर रात्री उशिरापर्यंत बैठक
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंना ‘ती’वाघनखे स्वत; ची वाटत असावीत”, शिंदे गटाचा ठाकरेंना टोला
हेही वाचा…ठाकरे गटाचा दक्षिण मुंबई लोकसभेचा उमेदवार ठरला, शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देणार
हेही वाचा…“गौतमी पाटीलचा डान्स शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल”, शिक्षणमंत्र्यांनी दिला कारवाईचा आदेश