मुंबई : ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाच्या सूत गिरणीवर आयकर विभागाने धाड मारली आहे. नागपुरात आयकर विभागाकडून ही कारवाई सुरू आहे. काल सकाळपासून सुरू झालेली ही छापेमारी अजूनही सुरू आहे. तर दुसरीकडे धुळ्याचे काॅंग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सूत गिरणीवरही छापेमारी करण्यात आली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचा दक्षिण मुंबई लोकसभेचा उमेदवार ठरला, शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देणार
कुणाल पाटील यांच्या सूत गिरणीवर कोणत्या विभागाने छापेमारी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, मात्र, काॅंग्रेसने आमदार कुणाल पाटील यांच्यावर नुकतीच, अमरावती, नागपूर लोकसभेची जबाबदारी सोपवली होती. नागपूरात तुकाराम उर्फ बंडू किसन तागडे यांच्या मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूत गिरणीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे.
हेही वाचा…“गौतमी पाटीलचा डान्स शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल”, शिक्षणमंत्र्यांनी दिला कारवाईचा आदेश
दरम्यान, आयकर विभागाने काल सकाळी ८ वाजता ही धाड टाकली. आजही छापेमारी सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्रांची छाननी करत आहेत. नागपुरातील नरखेड तालुक्यातील मालापूर येथे ही सूत गिरणी आहे. तागडे हे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कारवाईत पुढे काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोविड घोटाळा..! राऊतांचं नाव वापरून सुजित पाटकरने कंत्राट मिळवलं, इडीचा मोठा दावा
हेही वाचा…“ओबीसींना गाजर देणाऱ्या भाजपची बेगडी जागर यात्रा,” वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…बारामती अॅग्रो कारवाईबाबत रोहित पवारांचं ‘त्या’ दोन नेत्यांवर आरोप, अजित पवार म्हणाले…,
हेही वाचा…फडणवीसांनी अजित पवार अन् शिंदेंना दिला कानमंत्र, वर्षावर रात्री उशिरापर्यंत बैठक
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंना ‘ती’वाघनखे स्वत; ची वाटत असावीत”, शिंदे गटाचा ठाकरेंना टोला