मुंबई : लंडनच्या म्युझियमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात परत आणल्याचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. परंतु ही वाघनखं खरी नसल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. यावरून आता ठाकरे गट विरूद्ध भाजप असा राजकीय सामना रंगला आहे. यावरून आता शिवसेनेने वाघनखंबाबत भाजपला काही प्रश्न विचारले आहेत.
हेही वाचा…फडणवीसांनी अजित पवार अन् शिंदेंना दिला कानमंत्र, वर्षावर रात्री उशिरापर्यंत बैठक
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणत असल्याचा गाजावाजा मिंधे-भाजप सरकारनं केलाय. पण ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा आता इतिहास संशोधक संदर्भानिशी करतायत. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या संदर्भातील कोणतीही गोष्ट महाराष्ट्रासाठी भूषणावह तसेच पवित्र आहे. पण महाराजांची वाघनखं असल्याचं दाखवून मिंधे-भाजप सरकार काहीही खपवणार असेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणार असेल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही. ही वाघनखं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची असतील तर त्याचे तसे रेकॉर्ड लंडनच्या म्युझियममध्ये का नाहीत? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच ती वाघनखं शिवाजी महाराजांची असतील, तर मग ती भाड्याने का आणताय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंना ‘ती’वाघनखे स्वत; ची वाटत असावीत”, शिंदे गटाचा ठाकरेंना टोला
दरम्यान, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलिकडेच छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात परत आणणार असल्याची घोषणा केली होती. परंतु यावरून आता भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आहे. शिवरायांचे स्मारक बनवू शकले नाही, ते वाघनखं काय आणणार ? वाघनखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपचा नवीन फंडा असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणत असल्याचा गाजावाजा मिंधे-भाजप सरकारनं केलाय. पण ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा आता इतिहास संशोधक संदर्भानिशी करतायत.
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या संदर्भातील कोणतीही गोष्ट महाराष्ट्रासाठी भूषणावह तसेच… pic.twitter.com/AYae8HfQJe
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…धनंजय मुंडे निवडणुक आयोगाचे अध्यक्ष झालेत का ? सुप्रिया सुळेंचा मुंडेंना खोचक सवाल
हेही वाचा…ठाकरे अन् काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांवर आयकर विभागाची धाड, अडचणी वाढल्या
हेही वाचा…कोविड घोटाळा..! राऊतांचं नाव वापरून सुजित पाटकरने कंत्राट मिळवलं, इडीचा मोठा दावा
हेही वाचा…“ओबीसींना गाजर देणाऱ्या भाजपची बेगडी जागर यात्रा,” वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…बारामती अॅग्रो कारवाईबाबत रोहित पवारांचं ‘त्या’ दोन नेत्यांवर आरोप, अजित पवार म्हणाले…,