मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर ५५ वर्षानंतर शिवसेनेची अधिकृत सुत्रेही उद्धव ठाकरेंच्या हाती दिलीत. उद्धव ठाकरे यांच्या हातात जेव्हा शिवसेना आली तेव्हा आजचे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकारिणीत देखील नव्हते. उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्याचे नगरसेवक होते. निवडणुक कुणाचं दुकान आहे का ? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला आहे.
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंना ‘ती’वाघनखे स्वत; ची वाटत असावीत”, शिंदे गटाचा ठाकरेंना टोला
मग त्यांची शिवसेना कशी झाली? बाळासाहेबांच्या निधनाच्या वेळी एकनाथ शिंदे फार फार तर आमदार असतील. ते शिवसेनेचे नेते नव्हते आणि आज निवडणुक आयोग शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची सांगत आहे. जर एखाद्या गटाला संपूर्ण पक्ष देत असतील. तर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलेली भिती रास्त आहे. निकालाच्या आधीच काही जण निर्णय आमच्याच बाजूने लागणार असल्याचं सांगत होते. मग ही लोक कोणत्या आधारावर सांगत होते. आजच्या फुटलेल्या अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेलांना निवडणुक आयोगाने सदस्य करून घेतले आहे. न्याय मेलेला नाही, संविधान, सर्वोच्च न्यायालय जिवंत आहे. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचा दक्षिण मुंबई लोकसभेचा उमेदवार ठरला, शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देणार
दरम्यान, शिवसेनाप्रमाणे आता राष्ट्रवादीचीही निवडणुक चिन्ह आणि पक्षनावाबाबत निवडणुक आयोगात लढाई सुरू झाली आहे. संजय राऊतांनी केलेल्या टिकेला अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तेच तेच प्रश्न संजय राऊत विचारत आहेत. त्यांनी आता नवीन प्रश्न शोधले पाहिजेत. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय निवडणुक आयोगानं दिलं आहे. असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. त्यावर धनंजय मुंडे निवडणुक आयोगाचे अध्यक्ष झालेत का ? असा खोचक सवाल सुप्रिया सुळे यांनी मुंडेंना केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे अन् काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांवर आयकर विभागाची धाड, अडचणी वाढल्या
हेही वाचा…कोविड घोटाळा..! राऊतांचं नाव वापरून सुजित पाटकरने कंत्राट मिळवलं, इडीचा मोठा दावा
हेही वाचा…“ओबीसींना गाजर देणाऱ्या भाजपची बेगडी जागर यात्रा,” वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…बारामती अॅग्रो कारवाईबाबत रोहित पवारांचं ‘त्या’ दोन नेत्यांवर आरोप, अजित पवार म्हणाले…,
हेही वाचा…फडणवीसांनी अजित पवार अन् शिंदेंना दिला कानमंत्र, वर्षावर रात्री उशिरापर्यंत बैठक