भंडारा : भंडाऱ्याच्या पवनी येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ भंडारा विधानसभेचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बाईक रॅली काढली होती. हजारोच्या संख्येने तरूणांनी बाईकवरून पवनी ते भंडारा दरम्यान शक्तीप्रदर्शन केले. याच बाईक रॅलीचे नेतृत्व नरेंद्र भोंडेकर यांनी केले. यावेळी भोंडेकर यांनी शेवटी त्रिमूर्ती चौकात जाहीर सभा घेतली.
हेही वाचा…“ओबीसींना गाजर देणाऱ्या भाजपची बेगडी जागर यात्रा,” वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
नरेंद्र भोंडेकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एक लाख हजार मतदान घेत प्रतिस्पर्धी तत्कालीन भाजप उमेदवार अरविंद भालाधरे यांचा २३ हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी त्यांनी ट्रॅक्टर हे निवडणुक चिन्ह वापरले होते. यातच आता १ ऑक्टोंबरला काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचा समारोप त्रिमूर्ती चौकात झाला. यावेळी भोंडेकर यांनी टॅक्टरच्या ट्रॉलीचा वापर सभेचे स्टेज म्हणून केला.
हेही वाचा…बारामती अॅग्रो कारवाईबाबत रोहित पवारांचं ‘त्या’ दोन नेत्यांवर आरोप, अजित पवार म्हणाले…,
दरम्यान, नरेंद्र भोंडेकर यांना ट्रॅक्टर लॅकी ठरला आहे. त्यामुळेच की काय भोंडेकरांनी आगामी निवडणुकीसाठी प्रचार सुरू केल्याचं बोललं जात आहे. टॅक्टच्या ट्रॉलीचा वापर त्यांनी जाहीर भाषण करण्यासाठी केल्याने भोंडेकरांना आत्तापासून प्रचार सुरू करण्याची लगीन घाई झाली असल्याचं बोललं जात आहे. यातच नरेंद्र भोंडेकर यांनी सध्याच्या महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे. या महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भोंडेकरांना भाजप पाठिंबा देणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“दिल्लीतून आर्मी बोलवा, ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार”
हेही वाचा…“वाघनखं खरंच महाराजांची असतील तर मग ती भाड्याने का आणताय?” ठाकरे गटाचा भाजपला सवाल
हेही वाचा…धनंजय मुंडे निवडणुक आयोगाचे अध्यक्ष झालेत का ? सुप्रिया सुळेंचा मुंडेंना खोचक सवाल
हेही वाचा…ठाकरे अन् काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांवर आयकर विभागाची धाड, अडचणी वाढल्या
हेही वाचा…कोविड घोटाळा..! राऊतांचं नाव वापरून सुजित पाटकरने कंत्राट मिळवलं, इडीचा मोठा दावा