मुंबई : गेल्यावर्षाप्रमाणे याही वर्षी दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी एक महिन्याच्या आधीच दोन्ही गटाने महापालिकाकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र, मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा निर्धार आता ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…बारामती अॅग्रो कारवाईबाबत रोहित पवारांचं ‘त्या’ दोन नेत्यांवर आरोप, अजित पवार म्हणाले…,
जिथे हा शिवसेनेचे दसरा मेळावा होतो तिथे इतिहास होतो. मागील ५० ते ५५ वर्षापासून आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहोत. आता हे बेईमान लोक त्यावर दावा सांगत आहेत. शिवसेनेची मराठी माणसाची ताकद कमी करणं हेच आहे. हे षडयंत्र आहे. शिवसेनेच्या समोर शिवसेनेच्या लोकांचं आव्हान उभं केलं जात आहे. तुम्ही कितीही आव्हानं द्या, रॅली होणारच आणि ही रॅली शिवतीर्थावरच होणार आहे. तुमच्या सत्तेने आम्हाला चिरडण्याचं काम केलं, दिल्लीतून आर्मी बोलवा तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. रॅली होणारच आणि तीही शिवतीर्थावरच असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.
हेही वाचा…फडणवीसांनी अजित पवार अन् शिंदेंना दिला कानमंत्र, वर्षावर रात्री उशिरापर्यंत बैठक
दरम्यान, शिवसेना पक्ष फुटीप्रकरणानंतर प्रथमच मागच्या वर्षी दोन ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. त्याआधी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी दोन्ही गटाने रस्सीखेच सुरू केली होती. मात्र दसरा मेळाव्यासाठी महापालिकेने शिवाजी पार्क मैदान ठाकरे गटाला देण्यात आला. यातच आता एक महिन्याच्या आधीच दोन्ही गटाने महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“वाघनखं खरंच महाराजांची असतील तर मग ती भाड्याने का आणताय?” ठाकरे गटाचा भाजपला सवाल
हेही वाचा…धनंजय मुंडे निवडणुक आयोगाचे अध्यक्ष झालेत का ? सुप्रिया सुळेंचा मुंडेंना खोचक सवाल
हेही वाचा…ठाकरे अन् काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांवर आयकर विभागाची धाड, अडचणी वाढल्या
हेही वाचा…कोविड घोटाळा..! राऊतांचं नाव वापरून सुजित पाटकरने कंत्राट मिळवलं, इडीचा मोठा दावा
हेही वाचा…“ओबीसींना गाजर देणाऱ्या भाजपची बेगडी जागर यात्रा,” वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल