पुणे : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातच काल शरद पवारांची जुन्नर येथे सभा पार पडली. या सभेच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके शरद पवारांच्या स्वागतासाठी उभे होते. मात्र याच ठिकाणी आता अजित पवार गटाची ७ ऑक्टोंबरला सभा होत असून या सभेचे संयोजक अतुल बेनके म्हणून आहेत. यातच शरद पवारांच्या सभेला उपस्थित राहणारे अतुल बेनके अजित पवारांच्या सभेचे संयोजक असल्याने याची चर्चा सुरू आहे. यातच यावरून अतुल बेनके डबल ढोलकी खेळत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा…धनंजय मुंडे निवडणुक आयोगाचे अध्यक्ष झालेत का ? सुप्रिया सुळेंचा मुंडेंना खोचक सवाल
जुन्नर येथे १ ऑक्टोबर रोजी आदिवासी चौथरा अभिवादनानिमित्त जुन्नर तालुक्यात मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी आमदार अतुल बेनके उपस्थित होते. अतुल बनके यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु अतुल बेनके सध्या अजित पवार गटात असल्याचं म्हटलं जातं. यातच आता अजित पवार गटाचा ७ ऑक्टोंबरला जुन्नरच्या ओझर याठिकाणी मेळावा होत असल्याची चर्चा आहे. या मेळाव्याचं आयोजक अतुल बेनकेचं आहे. त्यामुळे आता अतुल बेनके काका-पुतण्यासोबत डबल ढोलकी खेळत आहेत का ? असा सवालही याठिकाणी उपस्थित होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर पुणे जिल्ह्यातील शिरूरचे आमदार अशोक पवार, हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके या तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. चेतन तुपे यांच्यासह आता अतुल बेनके हे देखील शरद पवार आणि अजित पवारांच्या कार्यक्रमाला दिसत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे आमदार नेमकी कोणती भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, जु्न्नरचं राजकारण तापणार
हेही वाचा…“बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी,” मंत्री दिपक केसरकर म्हणाले की..,”
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदाराला प्रचार करण्याची लगीनघाई, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…“दिल्लीतून आर्मी बोलवा, ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार”
हेही वाचा…“वाघनखं खरंच महाराजांची असतील तर मग ती भाड्याने का आणताय?” ठाकरे गटाचा भाजपला सवाल