मुंबई : विधानसभेत आज विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारविरोधात गरळ ओकत अनेक गंभीर आरोप केलेत. दहावीच्या मुलांच्या टॅब खरेदीच्या नावावर टेंडर पे टेंडर काढलं. याचाच परिणाम यशवंत जाधवांकडे मोठं घबा़डं मिळाले. दोन वर्षात 38 मोठ्या संपत्तीचा गठ्ठा त्यात सापडला. त्यामुळे असे प्रशिक्षण घेऊ नका, अन्यथा अर्थर रोडवर जावं लागेल, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सराकारला दिला.
“कुणी कुणाचे लाड अन् कुणी प्रसाद दिला, सांगता येणार नाही “; अजित पवारांची फटकेबाजी
मी पेनड्राईव्ह दिल्यावर लोकांना राग येतोय मात्र त्या दिवशी लागलेल्या लाईनचाही पेनड्राईव्ह मी द्यायला तयार आहे. सोलापूरात एक सचिन वाझे दर महिन्याला लाखो रूपये गोळा करत आहे. धुळ्याच्या उपनिबंधकाला वरीष्ट लिपीकाने लाच मागितली. तक्रारी केल्यानंतर सभागृहात बोलणाऱ्या आमदारांना खुन्नस धरतात. राऊत अपक्ष निवडणून आल्याने कारवाई होत नाही. याचं गृहराज्यमंंत्र्यांनी छातीवर हात ठेवून बैठकीत काय झालं सांगावं. मविआचा अर्थ महाविनाश, महावसुली आणि मद्यविक्री आघाडी असा आहे, असा हल्ला देखील त्यांनी चढवला.
योगीच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षांसह अंबानी, अदानी उपस्थित राहण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, शिवसेना पदाधिकारी रघुनाथ कुचेंना बलात्काराचा आरोप होऊन अटक नाही झाली. चक्क आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे बनावट आदेश काढले. अजित पवारांचा नंबर फोर्च करून खंडणी मागितली. करायचा तर दुसऱ्या कुणाचा तर करायचा, पण अजित दादांचा का? फेक माथाडीची पुणे जिल्ह्यात मोठी वसुली सुरू असल्याने पुण्यातले उद्योग धास्तावले आहेत.
कितीही हल्ला करा, आमचा महाविकास आघाडीचा मजबुत किल्ला; रोहित पवारांचा भाजपला टोला
पुण्यात एक गुन्हा घडला त्यातून अनेकांचे दाऊदसाठी फंडिंग करणाऱ्यांशी संबंध समोर आले. प्रवीण चव्हाण यांचा मुद्दा मी मांडला त्यातून तुम्ही एकाच केसमध्ये राजीनामा घेतला. इतर केसमध्ये राजीनामा नाही घेतला. सध्या अर्जावर अनेक मालमत्ता आपल्या नावावर जमीनी करून घेतल्या. याचं प्रकरण फरीद मोहमद्द अली वेल्डर याला पैसे दिल्याचे दाऊच्या भावाने सांगितलं होतं. एकेचाळीस लाखांना हीच प्रॉपर्टी त्याने विकत घेतली. तीच संपत्ती आता पुन्हा इसाक बागवान यांना फरीदच्या मुलाने बक्षीस पत्र म्हणून दिली. त्यात एका राजकीय नेत्याने मध्यस्थी करत सीर बागवानच्या भावाने हे स्टिंग ऑपरेशन केलंय. सरतेशेवटी बोलताना त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Read also:
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ते पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात
- “मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, त्यात ३०० आमदारांना घरं बांधणार”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- आमदार महेश लांडगे यांचं वीज समस्याबाबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
- ईमानदारी और सच्चाई का डर होना जरूरी है; जितेंद्र आव्हाडांना चंद्रकांत पाटलांचा टोला
- ” वडिलांच्या हत्यानंतर संघर्ष केला अन् नीच प्रवृत्तीला हरवलं “; निबाळकरांचं बीडमध्ये ज्वलंत भाषण