मुंबई : ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची 6 कोटीपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली. अशातच आता त्यांच्या दुसऱ्या मालमत्तेवर देखील ईडीने कारवाई सुरू केली आहे. यावर आता राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मुख्यमंत्र्याच्या मेहुण्यावर ईडीचं शुक्लकाष्ठ कायम; दुसऱ्या मालमत्तेवर देखील कारवाईचा बडगा
रोहित पवार म्हणाले की, इडीच्या कारवाया राज्यात सुरू आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की या कारवायांचे कागदपत्र 2017 रोजीच दिल्लीत गोळा झाले होेते. तरी देखील शिवसेनेने महाविकास आघाडीत येण्याचा निर्णय घेतला. आता पर्यंत 1600 पेक्षा जास्त केसेस दाखल झाल्या होत्या. त्यातून फक्त 9 केसेस निकाली निघाल्यात. त्यामुळे नाव खराब करण्याचं षडयंत्र, राजकीय फायदा होईल, पक्ष घाबरेल म्हणून करवाई होत आहे. परंतु महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झूकला नाही, ईडीसारख्या केंद्रीय तपास संस्थाचा जो मारा होतोय ते पाहून लोक शांत बसणार नाही.
“आम्ही कधीही पाठीवर वार करत नाही” काॅंग्रेसच्या प्रचारासाठी क्षीरसागरांनी भाजपवर तोप डागली
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आहेत त्यांना विचारलं तर आम्हाला निवडणुका नकोत. मध्यवर्ती भाजपला त्या हव्यात. सरकार व्यवस्थित, सुस्थितीत असताना त्यांना आता बघवत नाहीत. कीतीही मारा हल्ला करा. महाविकास आघाडीचा आमचा किल्ला मजबुत आहे. ताकद लावा. अजून पुढील पाच वर्षही प्रयत्न करावे लागतील. असा टोला देखील रोहित पवारांनी भाजपला लगावला.
“५० वर्षातील कामाचा हिशोब बिंदू चौकात काँग्रेसने द्यावा”; चंद्रकांत पाटलांचा बंटी पाटलांना टोला
दरम्यान, ईडीने आज पुष्पक बुलियन प्रकरणात ठाण्यातील प्रकल्पातील 11 सदनिकावर कारवाई केली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालिकीच्या या सदनिका असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे भाऊ आणि उद्धव ठाकरे यांचे मेहुणे होत. याअगोदर देखील मनी लॉण्डिंगप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच माहितीच्या आधारे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
Read also:
- राजकीय हेतूने कुणाला तरी त्रास देण्याचा कार्यक्रम ईडीने हाती घेतलाय :शरद पवार
- ऐरे गैरे नथ्थू खैरे, बीडचा सातबारा यांचा आहे का? जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीला संतप्त सवाल
- मग वडापावची गाडी असलेल्या शिवसैनिकांवर इडी कारवाई करेल; पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर राऊतांची प्रतिक्रिया
- कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढत; भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन कोणाच्या पथ्यावर?
- धनंजय मुंडेंनी स्वत:ची सहा मुले तसेच अनेक बायकाही लपवल्या; करूणा मुंडेंचा गंभीर आरोप