मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असताना अशातच अजून एक धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावर आज ईडीने कारवाई केली आहे. ईडीने उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची 6 कोटीपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली. अशातच आता त्यांच्या दुसऱ्या मालमत्तेवर देखील ईडीने कारवाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? किरीट सोमय्यांचा नवा खुलासा
श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेडवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पचपाखाडी भागातील दुसऱ्या मालमत्तेवरही कारवाई करण्याची तयारी सुरू केलीय. यावर बोलताना ते म्हणाले की, श्रीधर पाटणकर यांची एक संपती जप्त केल्याची माहितीत मिळत आहे. तसेच त्यावर पुर्ण माहिती मिळाली की बोलू. तेलाच्या किंमती वाढत आहे. काल संसदेत महागाईवर चर्चा झाली आणि सभागृह चालू दिलं नाही. आता निवडणूका संपल्या, हेच भाजपचं धोरण आहे. चाल आहे. लोक यात फसतात, असंही ते म्हणालेत.
“शेंडी जानव्याचे राजकारण नको”; विनायक राऊतांच्या वक्तव्यांवरून ब्राम्हण समाज आक्रमक
ते पुढे म्हणाले की, मला भिती वाटते आहे की, एक दिवस आमच्या शिवसैनिकीची वडापावची गाडी असेल त्यावर देखील ईड़ी कारवाई करेल, महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, पंरपरा आहे. विरोधी पक्षनेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरू आहे. जर आम्हाला सुडाच्या करायच्या असेल तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल त्याची आम्हाला आवश्यकता नाही, असंही ते म्हणालेत.
माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? तर ती आत्महत्या करेल; जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक वक्तव्य
दरम्यान, संजय राऊत यांनी देशातील रशिया युक्रेन, हिजाब,काश्मीर फाईल्स यावरून देखील भाजपवर टीका केली. देशातील खरी समस्या बेरोजगारी आणि महागाई आहे, मात्र भाजप वेगळ्याच मुद्यावर राजकारण करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
Read also:
- कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढत; भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन कोणाच्या पथ्यावर?
- धनंजय मुंडेंनी स्वत:ची सहा मुले तसेच अनेक बायकाही लपवल्या; करूणा मुंडेंचा गंभीर आरोप
- मुख्यमंत्र्याच्या मेहुण्यावर ईडीचं शुक्लकाष्ठ कायम; दुसऱ्या मालमत्तेवर देखील कारवाईचा बडगा
- “आम्ही कधीही पाठीवर वार करत नाही” काॅंग्रेसच्या प्रचारासाठी क्षीरसागरांनी भाजपवर तोप डागली
- “५० वर्षातील कामाचा हिशोब बिंदू चौकात काँग्रेसने द्यावा”; चंद्रकांत पाटलांचा बंटी पाटलांना टोला