बीड : बीडमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष आता चांगलाच जोर धरू लागला आहे. काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील दारी आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नुकतीच महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे सध्याचे आमदार आणि खासदार हे आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
“५० वर्षातील कामाचा हिशोब बिंदू चौकात काँग्रेसने द्यावा”; चंद्रकांत पाटलांचा बंटी पाटलांना टोला
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. उस्मानाबादमध्ये आमचा पालकमंत्री आहे आणि आम्ही अत्यंत चांगल्यापद्धतीने त्याठिकाणी काम करतो. इथं मात्र वारंवार शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न झालेला आम्हाला दिसून आले आहे. दोन हात करायची वेळ आली तर आम्ही ही कमी पडणार नाही, असा संतप्त इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? किरीट सोमय्यांचा नवा खुलासा
याच व्यासपीठावर जेव्हा जयदत्त क्षीरसागर यांचे भाषण झाले, त्यावेळी त्यांनी आमदार संदीप क्षीरसागरांवर सडकून टीका केली आहे. राजकारणामध्ये यश अपयश हे सुरुचं असतं. मात्र इथं काहीतरी वेगळंच सुरु आहे. काही जण एकदा निवडून आले आहेत आणि आपल्याला सत्तेचे पंख फुटले की काय ? अशी त्यांची अवस्था झाली आहे. हे असे ऐरे गैरे नथ्थू खैरे.. यांना वाटतं की बीडचा सातबाराच आपला झालाय, अशा कडक शब्दांमध्ये शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे आमदार संदीप यांना झापले आहे. संदीप क्षीरसागर हे बीडचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
“शेंडी जानव्याचे राजकारण नको”; विनायक राऊतांच्या वक्तव्यांवरून ब्राम्हण समाज आक्रमक
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत बीडमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे समोर आली आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. जय पराजय सुरूच असतो, सत्ता काय फक्त पाच वर्षांचीच असते, पण कुणाला वाटतं आपण आयुष्यभर सत्तेत राहणार, हा त्यांचा भ्रम आहे असा टोलाही त्यांनी पुतणे संदीप यांना हाणला आहे.
Read also:
- मग वडापावची गाडी असलेल्या शिवसैनिकांवर इडी कारवाई करेल; पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर राऊतांची प्रतिक्रिया
- कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढत; भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन कोणाच्या पथ्यावर?
- धनंजय मुंडेंनी स्वत:ची सहा मुले तसेच अनेक बायकाही लपवल्या; करूणा मुंडेंचा गंभीर आरोप
- मुख्यमंत्र्याच्या मेहुण्यावर ईडीचं शुक्लकाष्ठ कायम; दुसऱ्या मालमत्तेवर देखील कारवाईचा बडगा
- “आम्ही कधीही पाठीवर वार करत नाही” काॅंग्रेसच्या प्रचारासाठी क्षीरसागरांनी भाजपवर तोप डागली