मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असताना अशातच अजून एक धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावर आज ईडीने कारवाई केली आहे. ईडीने उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची 6 कोटीपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली. अशातच आता त्यांच्या दुसऱ्या मालमत्तेवर देखील ईडीने कारवाई सुरू केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही कधीही पाठीवर वार करत नाही” काॅंग्रेसच्या प्रचारासाठी क्षीरसागरांनी भाजपवर तोप डागली
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशाच्या समोरचा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आकडेवारी स्पष्ट सांगत आहे की राजकीय किंवा अन्य हेतून कुणाला तरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पाच दहा वर्षापुर्वी इथल्या लोकांना ईडी नावाची संस्था माहिती नव्हती. परंतु इडी आता गावागावामध्ये गेली आहे. या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सध्या दुर्दैवाने सध्या चालु असल्याचंही शरद पवार म्हणालेत.
“५० वर्षातील कामाचा हिशोब बिंदू चौकात काँग्रेसने द्यावा”; चंद्रकांत पाटलांचा बंटी पाटलांना टोला
श्रीधर पाटणकर यांच्य ठाण्यातील श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेडवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पचपाखाडी भागातील दुसऱ्या मालमत्तेवरही कारवाई करण्याची तयारी सुरू केलीय. त्यामुळे ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काल गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिल्याने पाटणकर यांच्यामागे कारवाईचे शुक्लकाष्ठ कायम राहिल असं बोललं जात आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? किरीट सोमय्यांचा नवा खुलासा
ईडीने आज पुष्पक बुलियन प्रकरणात ठाण्यातील प्रकल्पातील 11 सदनिकावर कारवाई केली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालिकीच्या या सदनिका असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे भाऊ आणि उद्धव ठाकरे यांचे मेहुणे होत. याअगोदर देखील मनी लॉण्डिंगप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच माहितीच्या आधारे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
Read also:
- ऐरे गैरे नथ्थू खैरे, बीडचा सातबारा यांचा आहे का? जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीला संतप्त सवाल
- मग वडापावची गाडी असलेल्या शिवसैनिकांवर इडी कारवाई करेल; पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर राऊतांची प्रतिक्रिया
- कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढत; भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन कोणाच्या पथ्यावर?
- धनंजय मुंडेंनी स्वत:ची सहा मुले तसेच अनेक बायकाही लपवल्या; करूणा मुंडेंचा गंभीर आरोप
- मुख्यमंत्र्याच्या मेहुण्यावर ईडीचं शुक्लकाष्ठ कायम; दुसऱ्या मालमत्तेवर देखील कारवाईचा बडगा