नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदी सलग दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ शपथ घेणार आहे. यासाठी राजधानी लखनऊमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशात 1985 नंतर दुसऱ्यांदा सलग भाजपने बाजी मारत मुख्यमंत्री बनवण्याचा मान मिळवला आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
धनंजय मुंडेंनी स्वत:ची सहा मुले तसेच अनेक बायकाही लपवल्या; करूणा मुंडेंचा गंभीर आरोप
भाजप कार्यकर्त्यांमध्ये बुलडोजर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. त्या सोहळ्यात भाजपचे वरिष्ठ नेते देखील सहभागी होणार आहे. मात्र यांच्यासोबतच विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांना देखील निमंत्रण दिलं असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्र्याच्या मेहुण्यावर ईडीचं शुक्लकाष्ठ कायम; दुसऱ्या मालमत्तेवर देखील कारवाईचा बडगा
यात काॅंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काॅंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुकेश अंबानी, गौतम अदानी, आनंद महिंद्रा यांच्यासह इतर मोठे उद्योगपतीही योगीच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.
“आम्ही कधीही पाठीवर वार करत नाही” काॅंग्रेसच्या प्रचारासाठी क्षीरसागरांनी भाजपवर तोप डागली
दरम्यान, उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार प्रचार-प्रसार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील अनेक सभा घेतल्या होत्या. भाजपला यावेळी समाजवादी पार्टी, काॅंग्रेसचे कडवे आव्हान होते. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत बघायला मिळाली होती.
Read also:
- कितीही हल्ला करा, आमचा महाविकास आघाडीचा मजबुत किल्ला; रोहित पवारांचा भाजपला टोला
- राजकीय हेतूने कुणाला तरी त्रास देण्याचा कार्यक्रम ईडीने हाती घेतलाय :शरद पवार
- ऐरे गैरे नथ्थू खैरे, बीडचा सातबारा यांचा आहे का? जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीला संतप्त सवाल
- मग वडापावची गाडी असलेल्या शिवसैनिकांवर इडी कारवाई करेल; पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर राऊतांची प्रतिक्रिया
- कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढत; भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन कोणाच्या पथ्यावर?