पुणे : मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर तयांनी महाविकास आघाडीच्या विरोधात असणाऱ्या पक्षांवर आणि नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
नवा अध्यक्ष कोण? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला होणार
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती आणि त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी अशी भूमिका देखील घेतली होती. भारतीय जनता पक्षाच्या सर्वच आमदारांनी भास्कर जाधव यांच्याविरोधात आक्रमक भूमिका सभागृहात घेतली होती. मोदींचा अपमान आम्ही सभागृहात कदापि सहन करणार असं देखील तालिका अध्यक्षांना फडणवीसांनी म्हटलं होतं.
अजित पवारांनी काल विधानसभेत चपराक लगावून सुद्धा एकनाथ शिंदेनी केली गडबड..
यानंतर भास्कर जाधव यांनी याबद्दल माफी मागितली. यावरूनच आता रुपाली ठोंबरे यांनी देंवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर फडणवीसांनी चकार शब्द न काढता फक्त बघ्याची भूमिका घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे बेजवाबदार वक्तव्य केले त्यावरही भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान झाल्यानंतर मात्र फडणवीफ ‘तडफनीस’ झाले, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच शिवप्रेमी दूधखुळा नाही, तुमची निष्ठा कुठे आहे? महाराष्ट्रा समोर उघडे पडले आहे, असा घणाघातही ठोंबरे यांनी यावेळी केला आहे.
Read also:
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्लीन चीट द्यायचे, ते स्वत:ला न्यायाधीश समजायचे – नाना पटोले
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्लीन चीट द्यायचे, ते स्वत:ला न्यायाधीश समजायचे – नाना पटोले
- भाजपाच्या प्रियांका बारसे ‘भरभरुन हसल्या’ अन् राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणेंच्या ‘अडचणी वाढल्या’!
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे निश्चित?
- विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल