मुंबई : देवेंद्र फडणवस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण उप, झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महापेरू बनले. मुख्य चा उप झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य तांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. उप ची नशा ही देशी बनावटीची आहे. कधीकाळी मुख्य असणाऱ्याने आज अशी देशी स्वीकारल्याचा परिणाण महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस सांभाळा. असं म्हणत सामानातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामानातून टिका करण्यात आली आहे. त्यावर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे”
किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊतांनी आज सामानातून फडणवीसांच्या विरोधात गरळ ओकळी. २०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वत:च्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्वावादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलं. उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्र पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत. पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- २ मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा. अशी जहरी टिका बावनकुळेंनी ठाकरेंवर केलीय.
हेही वाचा…“..त्यामुळे भाजपबरोबर गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही”, रोहित पवारांची भाजपवर जहरी टिका
दरम्यान, लवकरच “माजी” खासदार होणारे स्वतःच्या कायम स्वरुपी “माजी” मुख्यमंत्री राहणाऱ्या तुमच्या मालकाला पहिले सांभाळा.. DINO च्या दोस्ताना मुळे पेंग्विन कधी “माजी” मातोश्रीकर होईल हे लवकरच कळेल.. तुम्ही पण पाटकर प्रेमामुळे लवकरच “माजी” भांडुपकर म्हणून जेल मध्ये जाण्याचे दिवस जवळ आले आहेत.. कधी तो शेवटचा अग्रलेख लिहायचा दिवस येईल हे कळणार ही नाही.. मग अंधारात बसून जेल च्या भिंतीवर “माजी माजी माजी” लिहीत रडत बसायला लागेल.. असं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे.
किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून @Dev_Fadnavis’जींच्या विरोधात गरळ ओकली.
२०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 19, 2023
लवकरच “माजी” खासदार होणारे स्वतःच्या कायम स्वरुपी “माजी” मुख्यमंत्री राहणाऱ्या तुमच्या मालकाला पहिले सांभाळा..
DINO च्या दोस्ताना मुळे पेंग्विन कधी “माजी” मातोश्रीकर होईल हे लवकरच कळेल..
तुम्ही पण पाटकर प्रेमामुळे लवकरच “माजी” भांडुपकर म्हणून जेल मध्ये जाण्याचे दिवस जवळ आले…— nitesh rane (@NiteshNRane) August 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“स्पेशल ८०” महाराष्ट्रातले आमदार करणार भाजपसाठी सर्व्हे, तगडी फौज मध्य प्रदेश, राजस्थान अन् तेलंगणात दाखल
हेही वाचा…महाराष्ट्रातील आमदार सर्वात मालमाल…! सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र २ क्रमांकावर, अनेकजण कोट्यावधीचे मालक
हेही वाचा…“बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद द्या, साथ द्या,” उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
हेही वाचा…अजित पवार गट राज्यात सक्रीय, ३६ जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या ‘१०’ मोठ्या नेत्यांवर
हेही वाचा…मोठी बातमी…! महाराष्ट्राचे ५० तडपदार आमदार मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ५० उमेदवार ठरवणार