दापोली : मागची विधानसभा निवडणूक सोडली तर गेली २५ वर्षे दापोली विधानसभा मतदारसंघावर शिवसेना पक्षाचे वर्चस्व होते. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची एकहाती सत्ता या विधानसभा क्षेत्रावर राहिलेली आहे. मात्र गेल्यावेळी कुणबी अस्मितेच्या मुद्दय़ावर मतविभाजन होऊन २०१४ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
कर्जतमध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना!
या परभावनांतर त्याचे वर्चस्व कमी होऊ लागले आणि ज्याचे तात्कालिन पर्यावरण मंत्री आणि खेडचे सुपूत्र रामदास कदम यांनी आक्रमकपणे या शिवसेनेच्या बालेकिल्लय़ाची सूत्रे आपल्या ताब्यात घेण्यास सुरूवात केली. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत दळवी विरोधकांच्या साह्यने दापोली मंडणगडात कदम यांनी आपले वर्चस्व केले. त्यानंतर हळू हळू त्यांनी सूर्यकांत दळवींना पक्षाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पाडले.
निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप
माजी मंत्री रामदास कदम यांनी आपला मुलगा योगेश कदम यांना उमेदवारी मिळवून देत दापोली मतदारसंघात २०१९ मध्ये निवडूनही आणले. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी दापोली मतदारसंघात पाहायला मिळाल्या. शिवसेनेत असूनही सूर्यकांत दळवी यांनी भारतीय जनता पक्षाच्या, काँग्रेसच्या आणि इतरही विरोधी पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली. ही गोष्ट कदम समर्थकांना न पटणारी होती. त्यावरून रामदास कदम हेदेखील त्यांना खोचकपणे लवकरात लवकर पक्षांतर करण्याचे जाहीर आवाहन करत होते.
“आ देखें ज़रा किसमें कितना है दम”; नवाब मलिक यांचे प्रवीण दरेकरांना आव्हान
यानंतरहि दळवींनी शिवसेनेत राहणे पसंद केले होते. मात्र दळवींच्या कट्टर कार्यकर्त्यांनी नगरपंचायत निवडणूक तोंडावर आलेली असताना राष्ट्रवादीत जाण्याचे जाहीर करून आपली रणनीती स्पष्ट केली आहे?. ते राष्ट्रवादीत गेल्यानंतर दळवींचे देखील पक्षांतर होणार का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. पक्षांतराचा हा कार्यक्रम मुंबईतील राष्ट्रवादी भवनात होणार आहे. उद्या या कार्यक्रमाचे नियोजन असले तरी पक्षाचा वरिष्ठ नेता दिल्लीत असल्याने हा कार्यक्रम ते आल्यानंतर २ डिसेंबरला होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. जर सूर्यकांत दळवी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले तर निश्चितच आगामी काळात योगेश कदम यांना ते टक्कर देणार हे मात्र नक्की आहे.
Read Also :
- हिवाळी अधिवेशन: पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील भास्कर जाधव नावाचं अस्त्र गाजणार का?
- कोल्हापूर जिल्हा बँक बिनविरोधीच्या उंबरठ्यावर ? पाहिलं पाऊल पुढे टाकत आमदार आवाडेंनी घेतला पुढाकार
- सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नाईक प्रबळ दावेदार
- पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर