बुलढाणा : बंजारा समाजाचे नेते आणि बंडखोर आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेेश केल्याने बुलढाण्यात मोठी पोकळी निर्माण झाली अशी चर्चा बुलढाण्यात रंगली. त्यावर आता बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितले.
“..तर आता माझ्यावर पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील”; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
बंजारा समाजावर कोणचीही अशी बांधिलकी अजूनपर्यंत राहिलेली नाहीय. अनेक असे नेते होऊन गेले की, त्यांनी फक्त आम्ही समाजाचे नेते आहोत, असं सांगितलं पण त्यांनी समाजासाठी एकही कामं केलं नाही. मी 1995 पासून शिवसेनेशी जोडलो गेलो आहे. माझे वडिल गजानन राठोड तेव्हा अपक्ष आमदार होते. त्यावेळी त्यांनी 13 अपक्ष आमदारांचा गट तयार केला. त्यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप सरकारला कुठलंही मंत्रीपद न मागता पाठिंबा दिला होता. त्यामुळे मी देखील आजपासून शिवसेनेत प्रवेश करीत असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणार असं मत बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांनी सांगितले.
“मादर** संजय राऊत, तु यापुढे अशी भाषा वापरू नको”; बंडखोर आमदाराची जीभ घसरली*
संजय राठोड फक्त शिवसेना आणि बाळासाहेबांच्या नावावर निवडून आले आहेत. त्यामुळे मला त्यांचं मोठं आवाहन आहे, असं काही नाही. तसेच त्याचा आणि माझा एकच मतदार संघ असून अतिशय जवळचा नातेवाईक सुद्धा आहे. तसेच भावना गवळी, संजय राठोड हे जरी शिंदे गटात गेले तरी लोकं उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. तसेच माझी पहिल्यापासून शिवसेनेत जाण्याची इच्छा होती. आज ती पुर्ण होत आहे. जे गद्दार लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जी वेळ आणली आहे. त्यांना आता आपण मदत केली पाहिजे. असंही ते म्हणाले.
Read also
- “उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या सुडाच्या राजकारणाला लगाम लावला”
- “तर राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं”; उदयन राजेंचा आक्रमक पवित्रा
- “गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात, मग राज्यपाल, मंत्र्यांना का देत नाही”; संजय राऊत
- भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुण्याची ‘सुभेदारी’
- हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्र्यांना ४६ बंगले नागपुरात तयार..! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?