रायगड : ज्या पद्धतीने राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च पद असतं, त्याच पद्धतीने राज्यपाल हा राज्याचं पद असतो. त्यामुळे त्यांनी जर अवमान केलं असेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही. असं म्हणत खासदार उदयन राजे यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून देण्याच्या मागणीवर ठाम राहिले. आज रायगडावर शिवरायांचं समाधीस्थळाचं दर्शन घेऊन त्यांनी राज्यपालांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. तसेच जर राज्यपाल आज या गडावर असते तर त्यांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असा प्रत्यक्ष टोलाही त्यांनी राज्यपालांना लगावला.
“महाराष्ट्र द्वेषी शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्रातून लवकरच हद्दपार करा”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ ज्यांनी कोणी समर्थ केलं आहे. त्याबद्दल मत व्यक्त करणं कुणाचं दुमतच नाही. त्याच्यामुळे संजय राऊत जे काही बोलले त्यात चुकीचं काय? असा सवाल करत राज्यपालांना महाराष्ट्र बाहेर हाकलून लावण्याच्या भूमिकेवर मी आजही ठाम असून येणाऱ्या काही दिवसात याबद्दल माझी भूमिका स्पष्ट करेन, असा इशाराही उदयन राजे यांनी दिला आहे.
“ठाकरेंनी संजय राऊत या पोपटाचे तोंड बंद केलं पाहिजे, नाहीतर उरलेली जनताही निघून जाईल”
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जर कोणी वक्तव्य करीत असतील तर आपण शांत कसे बसायचं ? विकृतांच्या वक्तव्यावर पांघरून घालणाऱ्यांनाही लाज वाटली पाहिजे. त्यासाठी आता मुंबईतील आझाद मैदान आपल्यापासून दुर नाही. त्यामुळे आता आपल्याला एक तारीख ठरवायला पाहिजे. असा आंदोलनाचा इशारा उदयन राजे यांनी दिला आहे.
“कार्यकर्त्यांवर कारवाई होते मग कोश्यारींवर कारवाई का नाही”; संभाजी राजेंचा सवाल
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. राष्ट्रवादी आणि संभाजी राजेंच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील दौऱ्याच्या वेळी राज्यपालांना काळे झेंडे दाखविले. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात काय राजकीय घडामोडी घडणार त्या पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात, मग राज्यपाल, मंत्र्यांना का देत नाही”; संजय राऊत
- भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुण्याची ‘सुभेदारी’
- हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्र्यांना ४६ बंगले नागपुरात तयार..! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?
- “..तर आता माझ्यावर पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील”; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
- “मादर** संजय राऊत, तु यापुढे अशी भाषा वापरू नको”; बंडखोर आमदाराची जीभ घसरली*