मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या नेटकऱ्यांच्या निशान्यावरती आहेत. एका मुलाखतीच्या व्हिडीओवर एका युजर्सने लसीचे कंत्राट कुणाला दिलं? असा सवाल केला तर पेडणेकर यांनी ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिल. या उत्तरावरून त्या टीकेच्या धनी झाल्या. ‘तुझ्या बापाला’ टेंडर दिल म्हणनाऱ्या किशोरी पेंडणेकरांच टेडर मुंबई महापालिकेने रद्द केलं आहे.
कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं होतं. मात्र, या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या ९ कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक बसला आहे. दरम्यान, महापालिका नव्याने टेंडर प्रक्रिया करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘तुझ्या बापाला’ ट्विट हा शिवसैनिकाचा राग होता
कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. मात्र या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली होती. त्यामुळे नऊच कंपन्या या निविदा प्रक्रियेत होत्या. मात्र, लसींचा पुरवठा करण्यासाठीच्या अटी आणि शर्तीमध्ये या कंपन्या पात्र ठरल्या नाहीत. त्यामुळे अखेर ही ग्लोबल टेंडर प्रक्रिया रद्द झाली आहे. तसेच एकाही लस उत्पादक कंपनीने या निविदा प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. त्यामुळेही महापालिकेला लस पुरवठ्याच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारी कंपनी मिळू शकली नाही. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच लस मिळण्याची शक्यता मावळली असून आता केंद्र सरकारकडून येणाऱ्या लसींवरच पालिकेची सर्व भिस्त असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
‘आलं अंगावर, ढकललं कार्यकर्त्यांवर; आता म्हणाना.. ‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’
दरम्यान, टीकेची धनी ठरलेल्या महापौरांच्या ट्विटरला उत्तर देताना ‘हे ट्विट मी केलेच नाही’, असं पेडणेकर यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र, त्यावर आता मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी पेडणेकरांना टोला लगावला होता. ‘आलं अंगावर. ढकललं कार्यकर्त्यांवर. यापुढे म्हणा ना.. माझा मोबाईल, माझी जबाबदारी, असं ट्वीट करुन देशपांडे यांनी पेडणेकरांना टोला लगावला होता. आता परत महापालिकेने टेंडर रद्द केल्याने नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा महापौरांवर टीकेची झोड उठवली आहे.
Read Also :
- लसीसाठी कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले ? किशोरी पेडणेकर म्हणतात… ‘तुझ्या बापाला’
- ‘तुझ्या बापाला’ ट्विट हा शिवसैनिकाचा राग होता
- ‘आलं अंगावर, ढकललं कार्यकर्त्यांवर; आता म्हणाना.. ‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’
- ‘ED, CBI ची धमकी भारी, कुंकू वाचवायला कमळीच्या दारी’
- ‘अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे प्रतिमेला तडा गेला’
- ‘…तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल’