बारामती : भाजपकडून महाराष्ट्रातील पाच मतदार संघातून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमन बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सीतारमण यांच्या दौऱ्याने सुप्रिया सुळे चलबीचल झाल्या असल्याची, टिका भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.
“तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. बारामती, शिरूर, हतकणंगले, कोल्हापुर आणि सातारा या पाच लोकसभा मतदार संघात 22, 23, 24 रोजी दौरा असणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला एक एक प्रभारी केंद्रीय मंत्री निवडलेले आहेत. बारामतीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन भेट देणार आहेत, असं पडळकर म्हणाले.
“शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
हा फक्त बारामती मतदारसंघाचा विषय नाही. देशातील 144 मतदारसंघ निवडले आहेत. हे मतदारसंघ मजबुत करण्यासाठी हे दौरे आहेत. आणि त्यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. त्यामुळे 2024 ला बारामतीत परिवर्तन होणार आहे, असा दावा पडळकर यांनी केला आहे.
“दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
गेल्या दोन अडीच वर्षा मध्ये जेव्हा विश्वास घाताने महाविकास आघीडीचे सरकार आले. तेव्हा त्यांनी अडीच वर्षात भ्रष्टाचाराचा कहर केला. राज्यातील सर्व घोटळ्यात राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाविषयी लोकांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण झाला आहे, अशी टिका पडळकर यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.
Read also
- “मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत
- अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा
- शिक्षकांवर आरोप करणारा आमदार पोहचला थेट शाळेत, खिचडीवर ताव मारला अन्….
- “गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
- “आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा