मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राट भरतीची निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टिका केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. तर उद्या नाशकात कंत्राटी भरतीवरून राष्ट्रवादी युवा सेना रेल्वे रोको आंदोलन करणार आहे. परंतु त्याआधीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यावरून आता काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…परळीत गुंडाराज..! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर जीवघेणा ह’ल्ला, आरोपी फरार
सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात मागील काही दिवसापासून राज्यात जोरदार आंदोलने सुरू आहेत. यावरून विरोधकांनी सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे. यातच आता कंत्राट भरतीचा जीआर रद्द करण्यात येत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर अखेर रोजगार चोर सरकारला तरूणाईचा मजबूत दणका. युवांपूढे झुकावलंच लागलं. हा तरूणाचा, विरोधकांच्या एकजुटीचा, सत्याचा विजय असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय ‘या’ नेत्याला शिंदे गटात लागली लॉटरी, शिंदेंनी दिलं मोठं पद
तसेच बक्कळ कमाईचा यांचा डाव पुरता फसला आहे. चोर तो चोर वर शिरजोर. चांगलं काही घडतंय तर नाव सर्वात वर फडणवीस यांचं आलं पाहिजे असा यांचा हट्ट आहे आणि काही चुकीचं घडलं तर त्याची नैतिक जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलायची. स्वत: ची कारस्थाने दुसऱ्यांच्या माथी मारायची अशी भाजपची जुनी निती आहे. असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी फडणवीस यांच्यावर टिका केलीय.
हेही वाचा…“..त्यामुळेच एकनाथ खडसेंना मंत्रीपदावरून दूर गेले,” उदय सामंतांचं मोठं विधान
दरम्यान, कंत्राटी भरतीच्या संदर्भात पहिला निर्णय राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या सरकारमध्ये असतांना १३ मार्च २०१३ रोजी झाला होता. काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१० साली पहिला जीआर काढण्यात आला होता. त्यानंतर आणखी एक जीआर ६ हजार पदांच्या भरतीचा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक भरतीचा जीआर काढण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
अखेर ‘रोजगार चोर’ सरकारला तरुणाईचा मजबूत दणका.. युवांपुढे झुकावंच लागलं.हा विजय आहे तरुणाईचा, हा विजय आहे विरोधकांच्या एकजुटीचा, हा विजय आहे सत्याचा, हा विजय आहे महाराष्ट्राचा.
बक्कळ कमाईचा यांचा डाव पुरता फसलाय..!
चोर तो चोर.. वर शिरजोर..! चांगलं काही घडतंय तर नाव सर्वात वर… pic.twitter.com/beUzpCz71h
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…Video..! “बाळासाहेबांची डरकाळी, ठाकरी बाणा,” शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टिझर पाहलात का ?
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ नेत्यांनी सुषमा अंधारेंना दिली धमकी, फडणवीसांचा उल्लेख करत अंधारेंचा जोरदार पलटवार
हेही वाचा…भाजप-मनसेची बारामतीत मोठी खेळी, सुप्रिया सुळेंची मतं खायला ‘या’ फायर ब्रॅंड नेत्याला उमेदवारी देणार ?
हेही वाचा…कंत्राटी भरतीचा जीआर रद्द..! फडणवीसांची मोठी घोषणा, ठाकरे अन् पवारांवर केलेत गंभीर आरोप
हेही वाचा…अजित पवार गटातील नेत्यांसोबत वाकृयुद्ध, पण तरीही अजित पवारांनी रोहित पवारांचं ‘ते’ केलं काम